Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
कृषी चर्चेची बातमी

फुलांची मागणी घटल्याने फूल उत्पादक शेतकरी संकटात

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

जळगाव/प्रतिनिधी – राज्यातील बहुतांश शेतकरी वर्ग हा पारंपारिक पिकांबरोबरच फूलशेती मोठ्या प्रमाणावर करतो. लग्नसराई आणि सन-उत्सव यामुळे झेंडू, मोगरा, गुलाब, तसेच चाफा, इ फुलांना बाजारात मोठी मागणी असते. फूल उत्पादक शेतकरी डोळ्यात तेल घालून या फुलांची निगा राखतात. कारण वातावरणातील बदल आणि किटकांमुळे फुलशेतीवर अनेक संकटे ओढावतात. पण जळगाव जिल्ह्यातील फूल उत्पादक शेतकऱ्यावर आता वेगळेच संकट आले आहे. ज्यामुळे येत्या काळात त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.

लग्नसराई सुरू होती त्यावेळेस फुलांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढलेली होती. लग्नाची धामधूम कमी झाल्याने बाजारात आता फुलांची मागणी देखील कमी झाली आहे. त्यामुळे फुलांच्या किमतीत घसरण झाल्याचे चित्र आहे. फुलांना 80 रुपये ते 100 रुपये पर्यंतचा भाव मिळत होता. त्यामुळे शेतकरी राजाही खुश होता. परंतु आता लग्नसराई बंद झाल्याने फुलांची मागणी कमी आहे. त्यामुळे फुलांना 40 रुपये ते 50 रुपये भाव मिळत आहे. अशी माहिती फूल उत्पादक शेतकरी नामदेव माळी यांनी दिली. लखलखत्या उन्हामध्ये फूले तोडून शेतकरी विक्रीसाठी ठेवत आहे. परंतु भाव कमी मिळत असल्याने फूल उत्पादक शेतकऱ्याच्या पदरी निराशा येणार आली आहे.

Translate »
X