नेशन न्यूज मराठी टीम.
जळगाव / प्रतिनिधी – बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर रस्तावर खड्डे असल्याने स्थानिक नागरिक व राजकीय संघटन सरकारच्या रस्ते बांधकाम मंत्री व त्यांच्या कंत्राटदारांच्या गलथान कारभाराविषयी निषेध व्यक्त करताना जिल्ह्यात दिसून आले. ऐन गणेशोत्सवाच्या उत्साहात येथील गणेश व गणेशभक्तांना या खड्ड्यांचा त्रास होत आहे. गणेशोत्सव आता काही तासां वर येऊन ठेपल्याने गणेश मंडळ गणरायाची मूर्ती बाहेरून आणायला सुरुवात झाली आहे. चोपडा शहरातील सार्वजनिक मंडळ बऱ्हाणपूर येथून मोठ्या मुर्त्या आणल्या जातात.
बऱ्हाणपूर अंकलेश्वर हायवे वरती खड्डे मोठ मोठे असल्याने त्या रस्त्यावरुन प्रवास न करता नागरिक 20 ते 25 किलोमीटर फेऱ्याने जळगाव धरणगाव मार्गाने चोपड्यात प्रवेश करत आहे. परंतु सावखेडा पासून निमगव्हान पर्यंत तापी नदीवरचा पूल पास करताना गणेश भक्तांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन खड्डे बुजावेत असे गणेश भक्तांकडून मागणी होताना दिसत आहे.