नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
संभाजीनगर/प्रतिनिधी – छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन संकुलाने मागील काही महिन्यांचे थकलेले वीज बिल न भरल्याने तीन दिवसांपासून महावितरणने वीजपुरवठा खंडित केला होता. परिणामी विभागातील सर्वच कामकाज हे ठप्प पडले आहे. एकूण १२ लाख ५६ हजारांचे वीजबिल थकल्यामुळे हा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. अन्न व औषध पुरवठा विभागाचा अत्यावश्यक सेवेत समावेश असून देखील त्या विभागाचा वीज पुरवठा खंडित केला असल्याचे चित्र दिसत आहे.
त्यामुळे या विभागाने महावितरण अभियंताकडे वीज पुरवठा सुरळीत करावा अशी पत्राद्वारे मागणी देखील केली आहे. परंतु, अद्याप वीजपुरवठा सुरळीत झाला नसल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागातील कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. ही प्रशासकीय प्रक्रिया आहे, वर्षभरात आम्ही वीज बिल रिकव्हरीसाठी टार्गेटनुसार मोहिम राबवतो. त्यामुळे थकलेले वीजबिल सर्वांनी भरावेच, अशी माहिती महावितरण मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने दिली आहे.