कल्याण/प्रतिनिधी – कल्याण मधील प्रसिद्ध कुंभार वाडा परिसरात गणेश मूर्ती बनविल्या जातात. मागील एक दीड वर्षांपासून कोरोना काळात राज्य शासनाने कडक निर्बध घातल्या मुळे गणेश मूर्ती बनविणाऱ्या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. जुलै महिन्यात कल्याण सहित राज्यातील अनेक शहरात पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून अजून ही अनेक गावे पाण्याखाली असून ती उभे राहण्यासाठी अनेक महिने लागणार आहे. त्यातच गणेशोत्सव तोंडावर आला आहे. कोरोना काळात गेल्या वर्षी 75 टक्के व्यवसाय झाला. पण आता बऱ्याच नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या,आर्थिक परिस्थिति घसरली आहे.त्यामुळे त्याचा परिणाम सनावरही मोठया प्रमाणात झाला आहे. गणेश मूर्तिकारांचा चरिथार्थ याच व्यवसायवर अवलंबून आहे. साहजिकच त्यांच्यावरही उपासमारीची वेळ आली आहे. शासना कडून काहीतरी मदत मिळावी अशी मागणी मूर्तिकार करत आहेत.
- August 1, 2021