नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
बुलढाणा/प्रतिनिधी – महाराष्ट्रात उन्हाळा असताना ही अवकाळी पाऊस आणि वादळी वारा यांसह अनेक जिल्ह्यांत पावसाच्या सरी कोसळत आहे. बुलढाणा जिल्ह्यात हवामानाचा लहरीपणा दिसून येत आहे. वादळी वाऱ्यासह बऱ्याच ठिकाणी अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. कारण पावसामुळे जमिनीत आद्रता आणि दमट वातावरण तयार झाले आहे. या वातावरणामुळे भाजीपाला वर्गीय पिकांमध्ये किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांनी किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात असे आवाहन हवामान विभागाचे मनेष यदुलवार यांनी केले आहे. २० मे पासून बूलढाणा जिल्ह्यात कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. त्यासोबतच कमाल तापमानामध्ये सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे शेतीसाठी जमीन अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.