नेशन न्यूज मराठी टीम.
नांदेड / प्रतिनिधी – उद्योगांच्या खाजगीकरणा पाठोपाठ आता नोकर भरती हि देखील खाजगी कंत्राटदारांकडून करण्यात यायला सुरुवात झाली आहे. सरकारी क्षेत्रात प्रशासकीय व अन्य कर्मचारी पद भरती कंत्राटी पद्धतीने भरण्याचा शासकीय जी आर निघाला आहे. या विरोधी अनेक ठिकाणी निषेध नोंदवला जात आहे. नांदेड मध्ये देखील असा निषेध व्यक्त करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य सरकारने सहा सप्टेंबर रोजी काढलेला जीआर रद्द करण्यात यावा व तसेच जिल्हा परिषद शाळेचे खाजगीकरण त्वरित रद्द करण्यात यावे यासाठी जिल्हा परिषदेसमोर महाराष्ट्र राज्य शिक्षक जिल्हा शाखा नांदेड च्या वतीने ढोल बजाव आंदोलन करण्यात आले आहे. तरी प्रशासनाने मागण्यांकडे लक्ष देऊन त्वरित हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.