नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
मुंबई/प्रतिनिधी – मुंबई मालवणी पोलिसांनी ड्रग्जच्या कारखान्याचा पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली आहे. मालवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांना अमली पदार्थासह एक व्यक्ती सापडला. त्याच्याजवळ १ ग्रॅम ड्रग्ज आढळून आले. पोलिसांनी त्याला अटक करून चौकशी केली असता आरोपीचे नाव इब्राहिम शेख असल्याचे समजले. तो ड्रग्ज सप्लाय करायचा अशी माहिती पोलिसांनी मिळाली. चौकशी केल्यानंतर एका घरावर पोलिसांनी धाड टाकली.
ड्रग्ज बनवण्याचे सगळे साहित्य त्या ठिकाणी आढळून आले. त्या घरात एक व्यक्ती पोलिसांना रंगेहाथ सापडला आहे. त्या व्यक्तीचे नाव नूर आलम मोहम्मद आलम चौधरी असे त्या आरोपीचे नाव आहे. ५०० ग्राम पेक्षा जास्त ड्रग्ज तेथे आढळून आले. ज्याची किंमत 1 कोटींहून अधिक आहे. त्या ठिकाणी काही अर्धवट मालही आढळून आला. या प्रकरणात आरोपीला ताब्यात घेऊन पुढीस तपास पोलीस करत आहेत .