महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी महाराष्ट्र

डीआरआय ची तडफदार कामगिरी,घोरपडीच्या प्रजनन अवयवांची तस्करी करणारी टोळी जेरबंद

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

नाशिक/प्रतिनिधी – वन्यजीव तस्करी ही जागतिक स्तरावरील डोकेदुखी बनत चालली असून सुरक्षा यंत्रणा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांच्या प्रयत्नानंतरही त्यावर अद्याप पूर्णपणे नियंत्रण करता आलेले नाही. जगात दुसऱ्या क्रमांकाची तस्करी ही वन्यजीवांची होत असून काळी जादू औषध,सौंदर्य आणि इत्यादी प्रसाधनांच्या निर्मितीसाठी या वन्यजीवांना आपला जीव गमवावा लागतात. 

नाशिक जिल्ह्यातून घोरपडीच्या पुरुष प्रजनन अवयवांची तस्करी झाल्याची घटना समोर आली आहे. वन्यजीव तस्करांची एक टोळी घोरपडीचे पुरुष प्रजनन अवयव आणि मृदू प्रवाळ यासाठी संभाव्य खरेदीदार शोधत असल्याची गुप्त माहिती डीआरआय अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयाला मिळाली होती. या गुप्त माहितीनुसार डीआरआय मुंबईच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने तस्करांना पकडण्यासाठी योजना आखली. तस्कराने खरेदीदाराला नाशिक जिल्हातील नांदगाव रेल्वे स्थानकाजवळ बोलावले. मात्र सुमारे तीन तास त्यांचे स्थान बदलणे सुरू होते. डीआरआयचे पथक त्यांच्यावर पाळत ठेवून होते. तस्कराने शेवटी चारचाकी जाऊ शकणार नाही असे दुर्गम आदिवासी वस्तीतले काटेरी झुडपे असलेले कठीण ठिकाण ठरवले. टेहळणीसाठी तस्करांनी संपूर्ण परिसरात 3-4 गस्ती पथके ठेवली होती. डीआरआयच्या पथकाने ओळख लपवण्यासाठी आंबेडकर जयंतीचे औचित्य साधत आपल्या वाहनांवर निळे झेंडे लावले. त्यामुळे इतर वाहनांमध्ये त्यांची वाहने मिसळून गेली. तस्करांनी विक्रीसाठी माल काढताच डीआरआयच्या पथकाने त्यांच्या दिशेने धाव घेतली. पण बाईकवरच्या टेहळणी गटाने त्यांना अडवले. तस्कर सतर्क झाले आणि क्षणार्धात तीस जणांच्या समूहाने डीआरआयच्या पथकाला घेरले. त्यांनी अधिकाऱ्यांवर दगडफेक करायला सुरुवात केली. या संधीचा फायदा घेऊन तस्कर आणि त्याच्या सहाय्यकांनी मालासकट पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अधिकाऱ्यांनी अत्यंत दुर्गम परिसरात अर्धा किलोमीटरपर्यंत त्यांचा पाठलाग केला आणि तस्करांना ताब्यात घेतले.

डीआरआय च्या पथकाने वन्यजीव संरक्षण कायदा 1972 च्या सूची -I अंतर्गत, सूचीबद्ध 781 हत्था जोडी आणि 19.6 किलो मृदू प्रवाळ जप्त केले आहे. जप्त केलेल्या जंगली वस्तू आणि ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्ती वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत पुढील कारवाईसाठी महाराष्ट्र राज्य वनाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आल्या. नाशिक जिल्ह्याच्या दुर्गम परिसरात करण्यात आलेली ही कारवाई वन्यजीवांशी संबंधित गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठीची डीआरआयची प्रतिबद्धता दर्शवते.

Related Posts
Translate »