महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ताज्या घडामोडी महाराष्ट्र

९५ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी प्रारूप मतदार याद्या १५ फेब्रुवारीला

प्रतिनिधी.

मुंबई – विविध जिल्ह्यांमधील ९५ नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी; तसेच इतर विविध ३१ नगरपरिषदा, नगरपंचायतींमधील ३५ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी १५ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर २२ फेब्रुवारी २०२१ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.

श्री. मदान यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व 15 जानेवारी 2021 रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर 15 फेब्रुवारी 2021 रोजी प्रारूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर 22 फेब्रुवारी 2021 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर 1 मार्च 2021 रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. मतदान केंद्रांची यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 8 मार्च 2021 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.

प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, अशीही माहिती श्री. मदान यांनी दिली.

प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होणाऱ्या नगरपरिषदा/ नगरपंचायतींची जिल्हानिहाय नावे अशी: ठाणे-अंबरनाथ, कुळगाव- बदलापूर, मुरबाड, शहापूर, रायगड-खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, रत्नागिरी-मंडणगड, सिंधुदुर्ग-कसई- दोडामार्ग, वाभवे- वैभववाडी, पुणे-राजगुरूनगर, चाकण, नाशिक-चांदवड, निफाड, पेठ, देवळा, कळवण, सुरगाणा, दिंडोरी, धुळे-साक्री, नंदुरबार-धडगाव- वडफळ्या- रोषणमाळ, जळगाव-भडगाव, वरणगावअहमदनगर-अकोले, कर्जत, पारनेर, जामखेड, शेवगाव, औरंगाबाद-सोयगाव, जालना-बदनापूर, जाफ्राबाद, मंठा, घनसावंगी, परभणी-पालम, बीड- केज, शिरूर- कासार, वडवणी, पाटोदा, आष्टी, लातूर-जळकोट, चाकूर, देवणी, शिरूर- अनंतपाळ, उस्मानाबाद-वाशी, नांदेड-भोकर, हिमायतनगर, नायगाव, हिंगोली-सेनगाव, औंढा- नागनाथ, अमरावती-भातकुली, तिवसा, धारणी, नांदगाव- खंडेश्वर, बुलडाणा-संग्रामपूर, मोताळा, यवतमाळ-महागाव, कळंब, झरी, बाभुळगाव, राळेगाव, मारेगाव, वाशीम-मानोरा, नागपूर- मोवाड, वाडी, हिंगणा, कुही, भिवापूर, वर्धा-कारंजा, आष्टी, सेलू, समुद्रपूर, भंडारा-मोहाडी, लाखनी, लाखांदूर, गोंदिया- सडकअर्जुनी, अर्जुनी, गोरेगाव, देवरी, चंद्रपूर- चिमूर, सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती, गडचिरोली- मुलचेरा, एटापल्ली, कोरची, अहेरी, चामोर्शी, सिरोंचा, धानोरा, कुरखेडा आणि भामरागड.

Related Posts
Translate »