नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
भिवंडी/प्रतिनिधी – आयुष चिकित्सा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भिवंडी येथील खारबाव गावातील डॉ. शैलेश प्रभाकर म्हात्रे यांना आयुष्य ग्लोबल अवॉर्ड २०२३ ने सन्मानित करण्यात आले आहे. शिर्डी येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात शैलेश म्हात्रे यांना सन्मानित करण्यात आले आहे.डॉ.शैलेश म्हात्रे यांनी आपल्या खारबाव येथील श्री ऊर्जा आयुर्धामच्या माध्यमातून अनेक रुग्णांवर उपचार केले आहेत. आयुष इंटरनेशनल मेडिकल एसोसिएशन आणि आयुष ग्लोबल मेडिकल एसोसिएशन, तथा विस्तार केंद्र- राजकोट, एमएसएमई टीडीसी आग्रा व एमएसएमई मंत्रालय भारत सरकार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या सन्मानामुळे डॉ.शैलेश म्हात्रे यांच्यावर तालुक्यातून सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.या कार्यक्रम प्रसंगी एमएसएमई राजकोट सेंटर लिनसिक्स सिग्मावर आधारित आयुष हॉस्पिटल वर्ल्ड क्लास पेशेंट केयर या विषयावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ प्रवीण जोशी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी चित्रपट अभिनेते देवदत्त नागे,डॉ प्रवीण जोशी,प्रशिक्षण अधिकारी प्रणव पांड्या,चित्रपट अभिनेत्री ऋतुजा वागवे,अभिनेते सुयोग गोऱ्हे, कलर टीवी मराठी एग्जीक्यूटिव प्रोड्यूसर शांतनु बोरकर , डॉ सतीश कराळे,डॉ नितीनराजे पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते.