नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
संभाजीनगर/प्रतिनिधी- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 30वा नामविस्तार दिन आज मोठ्या उत्साहात पार पडला आहे. या नामविस्तार दिनाच्या पार्श्वभूमीवर भीम अनुयायी मोठ्या प्रमाणात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन व नमन करण्यासाठी येत असतात. त्यामुळे आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी या ठिकाणी येण्यासाठी सुरुवात झाली आहे. या लढ्यामध्ये सक्रिय असलेले भाई विवेक चव्हाण यांनी सकाळी विद्यापीठाला भेट दिली आहे.
विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मिळाले म्हणून लढा दिला त्या लढ्याचे भाई विवेक चव्हाण हे साक्षीदार होते. या लढ्यासाठी 15 जणांनी आपली जीवन यात्रा संपवली त्याच हुतात्म्यांचे स्मारक या ठिकाणी होण्यास विलंब लागत आहे. या गोष्टीचा निषेध करतो यावेळी भाई विवेक चव्हाण यांनी व्यक्त केला. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शहर पोलिसांचा मोठा तगडा बंदोबस्त इथे तैनात करण्यात आला होता