महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ठाणे ताज्या घडामोडी

डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने साकारली ऑक्सिजन बँक

कल्याण/प्रतिनिधी – डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने कोविड रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीनचे वाटप करण्यात आले. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या पुढाकाराने कोविडग्रस्त रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन मोफत देण्यात येत आहेत.

  ठाणे जिल्ह्यातील बहुतांश महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच रुग्णास ऑक्सिजनची गरज भासल्यास किंवा संवेदनशील परिस्थितीत रुग्णास जिल्ह्याअंतर्गत अथवा जिल्हाबाह्य रुग्णालयात घेऊन जात असताना, ऑक्सिजन अभावी रुग्ण वाटेतच दगावले असल्याची घटना देखील घडत असते. त्याचअनुषगाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून उपचारासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनची तसेच ऑक्सिजन खाटांची उपलब्धता कमी पडत आहे. रुग्णांना रुग्णालयात दाखल होईपर्यंत लागणाऱ्या कालावधीत रुग्णांची ऑक्सिजनची पातळी योग्य प्रमाणात राहावी या दृष्टीकोनातून डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना बाधित रुग्णांसाठी मोफत ऑक्सिजन बँक योजना सुरू करण्यात आली आहे.

या योजनेचा लाभ कल्याण, डोंबिवली, व इतर शहरांतील कोरोना बाधित रुग्णांना घेता येणार आहे. या योजनेद्वारे कोरोनामुळे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झालेल्या रुग्णांना घरच्या घरी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर द्वारे ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे. यावेळी जिल्हाप्रमुख गोपळ लांडगे,  शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, शहर प्रमुख राजेश मोरे, नगरसेवक दीपेश म्हात्रे, राजेश कदम,  संजय पावशे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »