नेशन न्यूज मराठी टीम.
गोंदिया/प्रतिनिधी – गोंदिया जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात घरगुती गॅसचे वजन हे कमी असल्याच्या तक्रारी प्रशासनाला येत होत्या. 15 किलोच्या गॅस सिलेंडर मध्ये 12 किलो किंवा 13 किलो गॅस असल्याच्या अशा तक्रारी दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत होत्या.
त्याच अनुषंगाने प्रशासनाने आपली हालचाल सुरु केली. महसूल विभागाचे तहसीलदार आणि नायब तहसीलदार व जिल्हाधिकारी यांनी तपासणी केली असता गॅस मध्ये दोन ते तीन किलो गॅस कमी असल्याच्या निदर्शनास आले असता त्यांनी संबधित गॅस एजन्सीची याविषयीची तक्रार गोंदिया शहर पोलीस स्टेशन येथे केली आहे. घरी घरगुती सिलेंडर आल्यानंतर त्याचे रितसर वजन करूनच घ्यावे तो आपला हक्क आहे व काही तक्रार असल्यास तक्रार निवारण क्रमांकावर त्वरित माहिती द्यावी असे जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.