नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण /संघर्ष गांगुर्डे – डोंबिवली येथील माउंटेनिअर्स असोसिएशन (मॅट) यांनी नागरिकांना छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्य काळाची सफर घडविण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. साहस शिवकालीन दुर्ग- शस्त्र प्रदर्शनाच्या निमित्ताने हि सफर घडणार आहे.
हे साहस प्रदर्शन शुक्रवार 29 सप्टेंबर ते रविवार ऑक्टोबर 23 दरम्यान सफायर बँकेट हॉल, तिसरा मजला, पी. पी. चेंबर्स, शहीद भगतसिंग रोड डोंबिवली पूर्व येथे सकाळी 10 ते रात्री 9 वाजे पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य पाहता येणार आहे. पहिल्या नागरी एव्हरेस्ट मोहिमेचे नेतृत्व करणारे ऋषिकेश यादव आणि एव्हरेस्ट वीर संतोष दगडे या मान्यवर गिर्यारोहकांच्या शुभहस्ते शुक्रवार 29 रोजी सकाळी दहा वाजता या साहस शिबिराचा उद्घाटन समारंभ संपत्र होणार आहे.
या प्रदर्शनात सिंधुदुर्ग व विजयदुर्ग या किल्ल्यांच्या अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघातर्फे तयार केलेल्या प्रमाणबद्ध प्रतिकृती व शिवकालीन शस्त्रास्त्रे, नाणी, तोफगोळे, मोडी लिपीतील कागदपत्रे, पारंपरिक बैठे खेळ तसेच सह्याद्री भ्रमण व गिर्यारोहण विषयी साधने पुस्तके, माहितीपट अशा भरगच्च कार्यक्रमाचा अनुभव डोंबिवलीकरांना घेता येईल.
या प्रदर्शनासाठी माउंटेनिअर्स असोसिएशन डोंबिवली (मॅड) सह अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन, ‘वेध’, सफायर बँकेट हॉल, रोटरी क्लब ऑफ न्यू डोंबिवली व अनेक संस्थांचे सहकार्य मिळाले असून तरूणांमध्ये इतिहास ,ऐतिहासिक वास्तू व संस्कृती याबाबत अभिमान व निसर्ग गिर्यारोहण याविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी योग्य मार्गदर्शनाचा उद्देश हे प्रदर्शन आयोजित करण्या मागे असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.