महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image कला/साहित्य ताज्या घडामोडी

डोंबिवलीकर तरुणाने साकारले अमेरिकेच्या राष्ट्रपतींचे थ्रीडी स्मृतीस्थळ

कल्याण : अमेरिकेचे तिसरे राष्ट्रपती थॉमस जेफरसन यांचा ४ जुलै रोजी स्मृतीदिन असून त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी डोबिंवलीतील शुभम निकम या तरुणाने त्यांचे स्मृतीस्थळ थ्रीडीमध्ये साकारले आहे. याआधी शुभमने शिवरायांची शिवजन्मभुमी थ्रीडी  मध्ये बनवली होती.

      शुभंम निकम हा सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग शिकत असून त्याला आर्किटेक्चरचीही आवड आहे. अमेरिकेचे तिसरे राष्ट्रपती थॉमस जेफरसन हे स्वतः देखील आर्किटेक्चर होते. त्याचप्रमाणे अनेक कौशल्ये त्यांच्यात होती. अमैरिकेच्या मुळ रहिवाशांना हाक्क मिळावेत यासाठी त्यांनी आयुष्यभर खुप कष्ट घेतले. ब्रिटिशांपासुन अमेरिका वेगळी होवुन संयुक्त आमेरिका व्हावी, अमेरिका देशात लोकांचे राज्य अर्थात लोकशाही यावी व अमेरिका प्रजासत्ताक देश व्हावा यासाठी त्यांचे खुप मोठे योगदान आहे.

थॉमस जेफरसन यांचा जन्म १ एप्रिल १७४३ साली तर मृत्यू ४ जुलै १८२६ रोजी झाला. वॉशिंग्टनमध्ये त्यांचे स्मृतीस्थळ आहे. दरवर्षी 4 जुलै रोजी नागरिक त्यांना श्रध्दांजली अर्पण करतात. थॉमस जेफरसन हे राष्ट्रपती या व्यतिरिक्त स्वतः ही एक आर्किटेक्चर होते सोबतच ते वकिल, गायक व तत्वज्ञानीही होते. अमेरिकेचे उपाध्यक्ष होण्यापुर्वी त्यांनी जॉन अॕडम्सच्या अंतर्गत अमेरिकेचेदुसरे उपाध्यक्ष म्हणुनही काम केले होते. अमेरिकेच्या स्वातंत्र्य घोषणेचे ते मुख्य लेखक होते सोबत प्रजासत्ताक व अमेरिकन लोकांना वैयक्तिक हक्क मिळावेत याचे त्यांनी समर्थन केले होते.    अशा या थोर व्यक्तिमत्वाला वंदन करण्यासाठी त्यांचे स्मृतीस्थळ थ्रीडीमध्ये बनवले असून, यापुढे रायगड किल्ला आणि कोल्हापूरचा शाहू पॅलेस थ्रीडी मध्ये साकारणार असल्याचे शुभम निकम याने सांगितले.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×