नेशन न्यूज मराठी टीम.
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – डोबिवली पूर्व परिसरात राहणारे आनंद श्रीधरराव मिरजकर वय ६३ वर्षे हे रिक्षा चालक आहेत. त्यांनी त्यांची ऑटो रिक्षा क्रमाक के एम.एच.०५ सीजी ७०५० ही पार्क करून ठेवली असता कुणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांची ऑटो रिक्षा चोरी केली.त्यानंतर त्यांनी तातडीने ऑटो रिक्षा चोरी गेल्याची फिर्याद डोंबिवली पोलिस ठाण्यात दाखल केली. डोंबिवली पो ठाणे गुरक- ०५/२०२३ कलम :- ३७९ भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.व तपासाची चक्रे फिरली.
सपोनि योगेश सानप, व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुन्हा दाखल होताच त्याचा तपास कसोशीने सुरु केला गुन्हा घडलेल्या परीसराची चाचपनी केली. तसेच ज्या दिशेने आरोपीत गुन्हयातील चोरी केलेली ऑटो घेवुन गेला त्याचा अंदाज घेत त्या मार्गांचे सीसीटीव्ही बारकाईने तपासण्यास सुरुवात केली. त्यात त्यांना काही सुगावा लागला. त्या सुगाव्याच्या आधारे गुप्त बातमीदाराच्या मार्फतीने महेश आनंद देवाडीगा ३५वर्ष या इसमास अटक केली. त्यानंतर चौकशी केली असता चोरी गेलेली ५०हजार किमतीची ऑटो रिक्षा हस्तगत करण्यास डोंबिवली पोलीसांना यश आले.

सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ कल्याण सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, सुनिल कुराडे सो वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर पोनि तडवीस यांचे मार्गदर्शना खाली डोबिवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि योगेश सानप, पोवा: विशाल वाघ, पोहवा प्रशांत सरनाईक, पो.ना.दिलीप कोठी, पो.अ शिवाजी राठोड, पो.अ नितीन सांगळे, पाटील यांनी केली आहे.