महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image राजकीय

गणेश उत्सव मंडळांना लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी परवानगी देण्याची डोंबिवली युवासेनेची मागणी

डोंबिवली/ संघर्ष गांगुर्डे – कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि येणाऱ्या तिसऱ्या लाटेला अटकाव घालण्यासाठी गणेश उत्सव मंडळांना लसीकरण केंद्र सुरू करण्याची परवानगी द्या जेणेकरून प्रभागा प्रभागातील नागरिकांचे लसीकरण होईल अशी मागणी शिवसेना युवासेनेचे अनमोल म्हात्रे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , आरोग्य मंत्री,आणि केडीएमसी आयुक्त यांच्याकडे केली आहे.
गेल्यावर्षी पासून कोरोना संक्रमणामुळे नागरिकांना, मंडळांना मनात असूनसुद्धा गणेशोत्सव एकत्रीत साजरा करता आला नाही. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने निर्बंधही शिथिल झाले आहेत. साधेपणाने उत्सव साजरा करण्याची परवानगी राज्य शासनाने देऊ केली आहे. सध्या गरज ही नागरिकांचे लसीकरण पूर्ण होण्याची आहे. त्यातच कोरोना प्रतिबंधक लसींचा केंद्राकडून अपुरा पुरवठा केला जात असल्यामुळे आजही अनेक नागरिक लसीच्या पहिल्या डोस पासून वंचित आहेत.त्यामुळे गणेशोत्सवादरम्यान प्रत्येक मंडळास लसीकरण केंद्र सुरू करण्याची परवानगी दिल्यास डोंबिवलीच्या प्रभागातील नागरिकांनाही सोयीचे होऊन जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण पूर्ण होईल. लसीकरणाचा वेग वाढवून आरोग्य सेवकांचा भारही कमी होईल. त्यासाठी लागणारा लस साठाही महापालिका प्रशासनास उपलब्ध करून घ्यावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे डोंबिवली पश्चिमेचे युवासेना उपशहर अधिकारी अनमोल म्हात्रे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×