नेशन न्यूज मराठी टिम.
कल्याण/प्रतिनिधी– महाराष्ट्रात सत्तांतर झाले आणि ट्रिपल इंजिनचे सरकार सत्तेत आले. सत्ताधाऱ्यांकडून ट्रिपल इंजिनचे सरकार जलद गतीने धावत असल्याचा दावा करीत असले तरी संपूर्ण महारष्ट्रात स्थानिक पातळीवर तीनही पक्षांचे पदाधिकारी एकमेकांवर कुरघोडी करतानाचे चित्र दिसून येत आहे. वरिष्ठ नेते जरी आम्ही एक असल्याचे सांगत असले तरी स्थानिक पातळीवरील पदाधिकारी एकमेकांवर टीकेची झोड उठवित आहे. याचा प्रतेय कल्याणात दिसून आला आहे.
कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या पदाधिकारी गुंड असून त्यांना सरकारने पोलिस बंदोबस्त दिला आहे अशी टीका भाजपाच्या एका कार्यक्रमात केली होती. या नंतर शिंदे गटाचे शहर प्रमुख यांनी भाजपा आमदार यांच्या वर तोफ डागली आहे.
ते म्हणाले धनुष्यबाणावर टिका करु नका, नाही तर तुमचे रॉकेट कोणत्या जागेत घालेल, हे सांगता येणार नाही. आम्हाला गुंड म्हणाऱ्या आमदारांच्या विरोधातही अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या मुलांना जे पोलीस संरक्षण दिले आहे. ते पोलीस वॉचमन सारखे काम करीत आहेत. आमदार गणपत गायकवाड हे युतीत मिठाचा खडा टाकण्याचे काम करीत आहेत. आम्ही युती धर्म पाळतो. भाजप आमदारांची नार्को टेस्ट नव्हे तर सायको टेस्ट करा अशी सडेतोड टिका शिवसेना शिंदे गट कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे