नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण ग्रामीण/संघर्ष गांगुर्डे -दिवा रेल्वे स्थानकातील समस्यांबाबतआणि स्थानकाच्या दुरुस्तीसाठी मनसेआमदार राजू पाटील यांनी केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाठपुरावा केला होता.या नंतर रेल्वे प्रशासनाने अमृत योजनेअंतर्गत दिवा स्थानकाच्या नूतनीकरणासाठी समावेश केला आहे.त्यामुळे या योजनेत दिवा स्थानकाचा समावेश झाल्या नंतर त्यासोबत रेल्वेच्या अन्य स्थानकांचा देखील समावेश केलाआहे. त्यामुळे आता दिव्यातील प्रवाश्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
मध्य रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करत आहेत. मात्र प्रवाश्यांना प्रवासादरम्यान स्थानकांवरील समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रवाश्यांच्या तक्रारींचा चिठ्ठा मनसे आमदार राजू पाटील यांनी केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासमोर लेखी निवेदनाद्वारे मांडल्या प्रत्यक्ष भेट घेऊन मांडल्या होत्या. या नंतर तातडीने या दिवा स्थानकाचा समावेश केंद्र शासनाच्या अमृत भारत योजनेत करण्यात आला आहे. त्यामुळे आता दिवा स्थानकाचे नूतनीकरण होणार आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रवाश्यांकडून स्थानकांच्या नुतनीकरणा संदर्भात सूचना मागवल्या आहेत. यासाठी रेल्वेने drm@bb.railnet.gov.in / cprooffice0@gmail.com या मेल प्रसिद्ध केल्या आहेत. मनसे आमदार राजू पाटील यांच्यासोबत रेल्वे संघटनांनी देखील या संदर्भात पाठपुरावा सुरू केला होता. त्यामुळे आता रेल्वे स्थानकांच्या नूतनीकरणासाठी प्रवाश्यांनी आपल्या सूचना नोंदवण्याचे आवाहन रेल्वे कडून करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत दिवा स्थानकासह अन्य रेल्वे स्थानकांचा जलदगतीने नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे आता प्रवाश्यांनी जास्तीत जास्त सूचना रेल्वेकडे करण्याचे आवाहन आमदार राजू पाटील यांनी केलं आहे.