Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
मुख्य बातम्या राजकीय

मोदींच्या सभेत सन्मानाचे स्थान नाही, कल्याणच्या शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा राजीनामा

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

https://youtu.be/BsEb87EA4lg?si=i3xI9pXFB0WBNdeM

कल्याण/प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात २० मे रोजी पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई दक्षिण अशा एकूण १३ मतदारसंघांत मतदान होणार आहे. निवडणुकीचा हा शेवटचा टप्पा असल्यामुळे महाराष्ट्रभर विविध पक्षांच्या प्रचारसभा होत आहे. मंतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून पराकोटीचे प्रयत्न केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.

पंतप्रधान मोदी यांची कल्याणमध्ये भव्य सभा होणार आहे. लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने घेतली जाणारी ही सभा कल्याण पश्चिम येथील व्हरटैक्स मैदानातील आधारवाडी जेल चौक येथे आयोजित करण्यात आली असून या सभेत महायुतीचे अनेक बडे नेते, कार्यकर्ते त्याचबरोबर पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. मात्र या सभेच्या काही तासांपूर्वीच कल्याण मुरबाड मधील शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

अरविंद मोरे यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवला आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले “मी या कल्याण मुरबाड शहराचा जिल्हाप्रमुख असूनही व्यासपीठावर निमंत्रितांमध्ये माझे नाव नाही आले. माझ्या हाताखाली काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मात्र महायुतीच्या या सभेसाठी आमंत्रित करण्यात आले. मला डावलले असल्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा दिला आहे.” जिल्हाप्रमुख हे सेनेमध्ये मानाचे पद आहे पण जर माझ्या पदाला मान सन्मान मिळत नसेल तर मग पद कशाला असा सवाल ही अरविंद मोरे यांनी उपस्थित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X