Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
कृषी

चंद्रपूर शेतकऱ्यांना पीक पद्धतीचे नियोजन करण्याचे जिल्हा कृषी विभागाचे आवाहन

प्रतिनिधी.

चंद्रपूर – शेतकऱ्यांनी खरीप हंगामाला सुरुवात होत असताना केवळ एकच एक पीक एकच एक जमीन क्षेत्रावर पिकाची फेरपालट न करता करीत राहणे जमिनीवर देखील अन्याय असून बदलती परिस्थिती लक्षात घेता खाद्यान्न निर्मिती जनावरांना चारा मिळणे आणि हातात आवश्यक पैसा राहणे यासाठी आपल्या पीक पद्धतीचे नियोजन करण्याचे आवाहन जिल्ह्याच्या कृषी विभागाने केले आहे.

कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या काळामध्ये उद्याची आवश्यकता काय हे बघून पिकाची पद्धत ठरली गेली पाहिजे सोबतच आपली कौटुंबिक परिस्थिती जमिनीची पत आणि उपलब्ध मनुष्यबळाचा विचार देखील यासाठी व्हावा अशी मार्गदर्शक सूचना जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ.उदय पाटील यांनी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर केली आहे.

साधारणता 1990 नंतर सोयाबीन पिकाची लागवड विदर्भ व अन्य भागात झाल्याची दिसते. त्या अगोदर मूग, ज्वारी, मटकी, कापूस, हे पीक शेतकरी घेत होते. त्यापैकी मूग,उडीद, मटकी, या पिकांपासून जनावरांना कडबा अर्थात चारा मिळत होता. तसेच ज्वारी पिकापासून हिरवा चारा व कडबा मिळत होता. परंतु, सोयाबीन या नगदी पिकाकडे सगळे वळल्यामुळे मुंग, उडीद, ज्वारी,मटकी, या पिकांचा अंतर्भाव पीक संरचनेमध्ये करण्याची सूचना कृषी विभागाने शेतकऱ्यांना केली आहे.

आंतर पिकाबाबत सल्ला देतांना कृषी विभागाने आपल्या जमिनीची पत मध्यम भारी असेल तर तूर पिकामध्ये सोयाबीन एकास दोन किंवा दोनास चार या प्रमाणात आंतरपीक घेतल्यास निवड तुरी पेक्षा फायदेशीर आढळून आले आहे. तसेच कपाशी पिकामध्ये लवकर येणारे सोयाबीन हे एकास एक किंवा एकास दोन या गुणोत्तरात घेणे फायदेशीर ठरू शकते.

कोरडवाहू शेती असेल तर धान्य चारा व कडधान्यांची गरज भागविण्याकरिता आणि अधिक आर्थिक लाभ मिळविण्याकरिता सोयाबीन ज्वारी व तूर या त्रिस्तरीय आंतरपीक पद्धतीत ( 6 : 2 : 1 ) किंवा (9 :2 : 1 ) या ओळीच्या प्रमाणात पेरणी करावी.

तसेच जमिनीत कपाशी तूर ज्वारी ही सलग पिके घ्यावीत.आंतरपिके तसेच दुबार पिकासाठी सुद्धा या जमिनी योग्य असल्यास कपाशी सोबत मूग उडिद ( एकास एक ) ज्वारी सोबत मूग तूर ( तीनास तीन ) तूर + मूग / उडिद ( एकास दोन कींवा दोनास चार ) तूर अधिक सोयाबीन ( एकास दोन ) कपाशी अधिक ज्वारी अधिक तूर अधिक ज्वारी (यासाठी 3 :1 : 1 : 1 / 6 : 1 : 2 : 1 ओळी ) पद्धत अवलंबवावी.

याशिवाय डवरणी च्या दोन पाळ्या द्याव्यात पहिली डवरणी पेरणी 15 ते 20 दिवसांनी व दुसरी 30 ते 35 दिवसांच्या दरम्यान आणि आवश्यकतेनुसार एक ते दोन वेळा निंदणी करावे. दुसऱ्या डवरणी च्या वेळी त्या डवऱ्याला दोरी गुंडाळून डवरणी करावी.यामुळे पिकाच्या रांगेला मातीची भर बसेल आणि सगळ्या पडल्यामुळे मूलस्थानी जलसंवर्धन होईल. सोयाबीनचे अधिक उत्पादन मिळण्यासाठी शिफारस केलेल्या खतमात्रा सोबत 50 ते 70 दिवसांनी दोन टक्के युरियाची फवारणी करा किंवा शेंगा धरण्याच्या अवस्थेत 2% पाण्यात विरघळणारे खत वापरणे योग्य ठरेल

Translate »
X