महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image इतर लोकप्रिय बातम्या

माहिम केळवे धरण गळतीबाबत जिल्हा प्रशासनाने वेळीच केली उपाययोजना

नेशन न्युज मराठी टीम.

पालघर– माहिम केळवे धरण ढासळल्यामुळे खालील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. तसेच आवश्यकतेनुसार एनडीआरएफची टीम सुद्धा तैनात करण्यात आली होती. परिसरातील गावामधील नागरिकांना स्थलांतरित करण्याची तयारीसुद्धा जिल्हा प्रशासनाने केली होती. या उपाययोजना जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या देखरेखीखाली गळती प्रतिबंधक कामे वेळीच जिल्हा प्रशासनाने केल्यामुळे होणारा अनर्थ टाळता आला आहे असे कृषी, माजी सैनिक कल्याणमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

झांझरोळी गावा जवळील माहिम केळवे लघु पाटबंधारे योजनेअंतर्गत असलेल्या धरणात गळती लागली होती. या गळती  प्रतिबंधक उपाययोजनांच्या कामाची पाहणी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी करुन वरीष्ठ अधिकारी यांना सूचना केल्या त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदेही वाढाण, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिध्दाराम सालीमठ, पोलीस अधिक्षक दत्तात्रेय शिंदे तसेच पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

धरणाची गळती होत असल्याची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनला आपातकालीन उपाययोजना करण्याच्या सुचना देण्यात आल्या. जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या देखरेखेखाली गळती प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या असून भविष्यात धरण अधिक सुरक्षित करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

धरणामध्ये सद्यस्थितीत 2.46 द.ल.घ.मी. पाणीसाठा उपलब्ध असून गळती प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी आवश्यक 0.50 द.ल.घ्‍.मी. पिण्याच्या पाण्याचा पाणीसाठा राखीव ठेवून 2.00 द.ल.घ.मी. पाणीसाठा मार्च अखेरपर्यंत कमी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सद्यस्थितीत धरणाच्या अन्य भागातून पाणी सोडण्याचा पर्यायाचा अभ्यास करण्यात येत आहे. यामुळे कोणतेही नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×