Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image थोडक्यात शिक्षण

केडीएमसी शिक्षण विभागाच्यावतीने दिव्यांग बालकांना साहित्य वाटप

नेशन न्यूज मराठी टिम.

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने समग्र शिक्षा अंतर्गत समावेशित शिक्षण उपक्रमात केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्याहस्ते दिव्यांग बालकांना मोफत साहित्य वाटप करण्यात आले. यामध्ये अस्थिव्यंग, सेरेब्रल पाल्सी, बहुविकलांग, श्रवणदोष व दृष्टीदोष विशेष गरजा असणा-या विद्याथ्र्यांची मोजमाप तपासणी अंती संदर्भित झालेल्या बालकांना हे साहित्य वाटप करण्यात आले. 

केडीएमसी शिक्षण विभागाच्यावतीने ७ फेब्रुवारी रोजी मनपा शाळा क्र. ८ वालधुनी कल्याण येथे व ९ फेब्रुवारी रोजी मनपा शाळा क्र. ८१ डोंबिवली (प) येथे मोजमाप तपासणी शिबीर ऑल इंडीया इंस्टीटयुट ऑफ फिजिकल मेडीसिन अॅन्ड रिहॅबिल्टेशन, हाजी अली मुंबई यांच्या तज्ञ डॉक्टर, प्रोथेस्टीट व ऑथेस्टीट, ऑक्युपेशनल थेरेपीस्ट, व फिजिओथेरपीस्ट यांच्या सहाय्याने करण्यात आले. तपासणी अंती या विद्यार्थ्यांना साहित्य संदर्भित करण्यात आले. तसेच १४ फेब्रुवारी रोजी १६ विद्यार्थ्यांची श्रवण-हास तपासणी करुन ऑडीयोग्राम काढल्याबाबत विशेष तज्ञ व विशेष शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना श्रवण यंत्र मिळणेबाबत कार्यालयात अर्ज केला आहे. १६ फेब्रुवारीरोजी बाई रुक्मिणीबाई दवाखाना येथे दृष्टीदोष मुलांची दृष्टीमुल्यमापन तपासणी करण्यात आली होती. तपासणी अंती विद्यार्थ्यांना लो व्हिजन साहित्य संदर्भित केले आहे.

समग्र शिक्षा अंतर्गत समावेशित शिक्षण उपक्रमातुन आज कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिर येथे केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या हस्ते ० ते १८ वयोगटातील ६७ विशेष गरजा असणा-या दिव्यांग बालकांना विविध साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्याक्रमास अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे, उप आयुक्त स्वाती देशपांडे, उप आयुक्त अतुल पाटील, सचिव संजय जाधव, जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, डीआयइटी रहाटोली अधिव्याख्याता दिनेश चौधरी व जिल्हा समन्वयक भरत बैखंडे उपस्थित होते.

शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी विजय सरकटे यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विशेष तज्ञ प्रांजल जाधव व संगिता गणवर, विशेष शिक्षक वंदना पिंगाने, निलिमा खुंटले, मंगल बुरुंगले, बंडु घोडे, मिनाक्षी फुलपगारे, अनिता पाटील इ. यांनी मेहनत घेली. समग्र शिक्षा आय. ई. समन्वयक मिलिंद अहिरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन व कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विशेष मेहनत घेतली.

या उपक्रमात रोलेटर, कॉर्नर सिटींग, कमोड चेअर, लोव्हिजन किट, ब्रेल किट, वॉकर, पेडाट्रीक व्हिलचेअर, व्हिलचेअर, हैंड स्टिक, स्प्लिट, सी.पी. चेअर, एल. बी. क्रचेस, थेराबँड मध्यम, डि. श्रवण यंत्र, ओरिएंटेशन किट आदी साहित्य दिले असल्याची माहिती केडीएमसी शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी विजय सरकटे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X