महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image मुंबई लोकप्रिय बातम्या

केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते दिव्यांगाना सहाय्यक उपकरणे व साधनांचे वितरण

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई/प्रतिनिधी – केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्य मंत्री डॉ. रामदास आठवले यांनी आज मुंबईत वांद्रे येथील अली यावर जंग राष्ट्रीय मूक बधीर (दिव्यांगजन) (एवायजेएनआयएसएचडी) संस्थेमध्ये दिव्यांगजन व्यक्तींना एडीआयपी योजने अंतर्गत सहाय्यक उपकरणे आणि साधने वितरित केली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना सहाय्यक उपकरणे आणि साहित्याचे वाटप करण्यासाठी देशाच्या विविध भागांत अशा 72 ‘सामाजिक अधिकारिता’ शिबिरांचे आयोजन केले आहे. ही उपकरणे उपलब्ध करण्यासाठीचा पूर्ण खर्च भारत सरकार करणार आहे.  

  एवायजेएनआयएसएचडी (डी) आणि एएलआयएमसीओ यांनी एकत्र येऊन  एएलआयएमसीओ च्या सहाय्याने संस्थेच्या मुंबई येथील आवारात निदान चाचणी आणि सहाय्यक उपकरणे वितरीत करण्यासाठी शिबीर आयोजित करून ही मोहीम राबवली. यावेळी वितरित करण्यात आलेल्या सहाय्यक उपकरणांमध्ये भिन्न-मति मुलांसाठी एमएसआयईडी संच,  अंध मुलांसाठी स्मार्ट फोन आणि कर्णबधीर रुग्णांसाठी श्रवण यंत्रे याचा समावेश होता. मुंबईमधील शिबिरात 52 लाभार्थ्यांना निदान चाचणी, डिजिटल प्रोग्रामिंग, समुपदेशन आणि बॅटरीची तरतूद यासारख्या सहाय्यक सेवेसह श्रवण यंत्रे मिळाली.

 या कार्यक्रमाला संबोधित करताना डॉ. रामदास आठवले म्हणाले, “दिव्यांगजनांकडे विशेष क्षमता आहेत, ज्याचा वापर करून ते आपले जीवन जगतात. त्यांना मदत करणे हे आपल्यासाठी महत्वाचे आहे. आपण त्यांना योग्य मार्ग दाखवायला हवा”. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘दिव्यांगजन’ हा शब्दप्रयोग प्रचलित केला हे नमूद करून, 2016 मध्ये गुजरात मधील नवसारी येथे पंतप्रधानांच्या वाढदिवशी (सप्टेंबर 17) आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक अधिकारिता शिबीर आणि एडीआयपी शिबिरामध्ये दिव्यांग बंधू भगिनींनी विक्रमी संख्येने नोंदवलेल्या सहभागाचे डॉ. आठवले यांनी स्मरण केले.

देशभरात 72 ठिकाणी आज आयोजित करण्यात आलेल्या वितरण शिबिरांचा लाभ विविध प्रकारचे अपंगत्व असलेल्या दिव्यांगजन व्यक्तींना मिळेल असे एवायजेएनआयएसएचडी (डी) चे संचालक डॉ. अरुण बनिक म्हणाले. मला विश्वास आहे की हे शिबीर यशस्वी होईल आणि आपल्यला दिव्यांग बांधवांचे जीवन सुकर होईल असे ते म्हणाले.         

देशभरात आतापर्यंत 12 हजार सामाजिक अधिकारिता शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, 36,000 दिव्यांगजन व्यक्तींना मोफत सहाय्यक उपकरणे आणि साहित्याच्या वितरणाचा लाभ मिळाला आहे. या शिबिरांमध्ये 4 हजारापेक्षा जास्त कोचलीयर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तसेच आतापर्यंत 32 हजार दिव्यांगजन व्यक्तींना स्वयंचलित तिचाकी वाहनांचा लाभ मिळाला आहे.   

अली यावर जंग राष्ट्रीय मूक-बधीर (दिव्यांगजन) संस्था ही संस्था सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अपंग व्यक्तींचे सक्षमीकरण विभागा अंतर्गत देशभरातील उच्चार आणि श्रवण अक्षमता असलेल्या (मूक-बधीर) व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या सर्वोच्च राष्ट्रीय संस्थांपैकी एक आहे.  

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×