नेशन न्यूज मराठी टीम.
नागपूर/प्रतिनिधी – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना मंत्री पदावरून बर्खास्त करावे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी नागपूर शहरतर्फे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले व कर्मवीर भाऊराव पाटील या महामानवांबद्दल चुकीचे, आक्षेपार्ह्य व वादग्रस्त विधान केले.
ज्यामुळे संपूर्ण आंबेडकरी तथा बहुजन जनतेच्या भावना दुखावल्या गेल्यात. चंद्रकांत पाटील यांच्या व्यक्तव्याचा आम्ही निषेध करतो. संविधान निर्माता डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुष यांचेबद्दल आक्षेपार्ह्य व वादग्रस्त विधान करून चंद्रकांत पाटील यांनी राज्याची सामाजिक स्वास्थ बिगडविण्याचे काम केले आहे. तेव्हा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना मंत्री पदावरून तात्काळ बर्खास्त करावे.चंद्रकांत पाटील यांचेवर शाई फेकणाऱ्या युवकांवर गैरकानूनीरित्या कलम ३०७ व ३५३ लावल्या गेले, व शाई हे शस्त्र असल्याचा नविनच जावाई शोध महाराष्ट्र पोलिसांनी लावला.
शाई फेकल्यामुळे कोणाचाही जिव जावू शकत नाही. तेव्हा युवकांवरिल सर्व कलम मागे घेण्यात यावे. शाई प्रकरणातील निलंबित करण्यात आलेल्या महाराष्ट्र पोलिस खात्यातील संपूर्ण ११ पोलिस अधिकारी तथा कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्यात यावे.या मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी नागपूर शहर तर्फे शहर अध्यक्ष रवीभाऊ शेंडे यांच्या नेतृत्वात वेरायटी चौक येथे नारे निदर्शने करण्यात आले. वरिल मागण्यांचे निवेदन महाराष्ट्रसचे मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले.