कल्याण/संघर्ष गांगुर्डे -वंचित बहुजन आघाडी चे सर्वेसर्वा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच वंचित बहुजन आघाडी चे प्रभारी अध्यक्ष आद.रेखाताई ठाकुर व जेष्ठ उपाध्यक्ष डॉ.अरुण सावंत यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रात काही भागात पुरामुळे मानवी जीवन विस्कळित झाले त्यातच एक हात मदतीचा म्हणून वंचित बहुजन महिला आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्ष मायाताई कांबळे यांच्या नेतृत्वाखाली व सहकारी महिला पदाधिकारी यांच्या सोबत महाड येथील नुकसान झालेल्या भागात भेट देऊन तेथील नागरिकांना गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी पक्षाच्या वतीने वंचित बहुजन युवक आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निलेश विश्वकर्माजी व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधवजी महाड येथील पुरग्रस्त भागाला भेटी देण्यासाठी आले होते .त्यावेळी त्यांच्या हस्ते गरजुना अन्नधान्य चे व इतर गरजेच्या वस्तुंचे वाटप करण्यात आले.वंबआ रायगड चे जिल्हा अध्यक्ष विश्वतेज साळवी ,महासचिव सागर भालेराव व सदस्य श्रीहर्ष कांबळे इतर पदाधिकार्यांनी सहकार्य केले.या मदत कार्यात ठाणे जिल्ह्य महिला महासचिव रेखाताई कुरवारे, उल्हासनगर महिला आघाडी अध्यक्ष रेखाताई उबाळे,महिला उपाध्यक्ष वर्षाताई अहिरे,भिवंडी शहर मीराताई मते,वंचित बहुजन आघाडी कल्याण (पु)सचिव देवानंद कांबळे,डोंबिवली शहर युवा गोपाळ रायबोले,सम्यक विध्यार्थी आंदोलन ठाणे जिल्हा मा.उपाध्यक्ष रुपेश हुंबरे तसेच ठाणे जिल्हा अंतर्गत सर्व शहर कार्यकारिणी यांनी मनापासून मदत केली.