प्रतिनिधी.
सोलापूर – संपूर्ण राज्यभर मध्ये लॉकडाऊन काळामध्ये सर्वसामान्य जनतेचे मोठ्या प्रमाणात हाल झाले होते तसेच सर्व नागरिकांना वाढीव लाईट बिल आल्यामुळे सर्व नागरिक त्रस्त आहेत त्याच्यामुळे काही नागरिकांचे वीज कनेक्शन कट करत आहेत त्याच्यामुळे सर्व नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशजी आंबेडकर यांनी महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, जोपर्यंत महाराष्ट्र सरकार वीज बिल माफ करत नाहीत. कोणीही लाईट बिल भरू नये त्याच अनुषंगाने आज सोलापूर शहरात वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी पत्रकार परिषद घेऊन नागरिकांना आवाहन केले व सुमारे १००० रिक्षावर “वीजबिल भरू” नका असे फलक सामान्य जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी लावण्यात आले आहे.
एवढे करूनही विजबिल माफ नाही झाल्यास वंचित बहुजन आघाडी च्या वतीने एक लाख नागरिकांचा मोर्चा काढण्याचा इशारा यावेळेस नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी दिलासदरच्या वेळी वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक गणेश पुजारी नगरसेविका ज्योतीताई बमगुंडे कोषाध्यक्ष बबन शिंदे प्रदेश कार्यकारणी सदस्य अंजनाताई गायकवाड महिला जिल्हाध्यक्ष रेश्मा मुल्ला युवा नेते गौतम महाराज चंदनशिवे अनिरुद्ध वाघमारे विनोद इंगळे विठ्ठल पाथरूड विजयनंद उघडे सचिन शिराळकर चाचा सोनवणे रवी थोरात अण्णासाहेब वाघमारे, अँड.विशाल मस्के, अँड.मालिक कांबळे विजय बमगुंडे, सुजाता ताई वाघमारे, मंदाकिनी शिंगे धम्मरक्षता कांबळे हेमा अनिरुद्ध वाघमारे पल्लवी सुरवसे पुष्पा गायकवाड फुलावती काटे आदी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.