नेशन न्यूज मराठी टीम.
धुळे / प्रतिनिधी – लाचखोर कन्सल्टंट सिव्हिल इंजिनिअर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सापळ्यात अडकला आहे. एमआयडीसी कार्यालयातील अधिकाऱ्यासाठी तो एंजट म्हणून काम करीत होता. अहमद वहा अहमद हसन अन्सारी असे या लाचखोर सिव्हिल इंजिनिअर चे नाव आहे. त्याच्याविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईबाबत धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांनी माहिती दिली की, यातील तक्रारदार यांचे एमआयडीसी अवधान धुळे येथील भूखंडावर वाढीव बांधकाम मंजूरीचे काम कार्यकारी अभियंता एमआयडीसी धुळे यांच्याकडे प्रलंबित होते. त्यासाठी आरोपी इसम यांनी एमआयडीसी कार्यालयातील अधिकाऱ्यांवर त्याचा प्रभाव वापरून तक्रारदार यांचे काम करून देण्यासाठी एमआयडीसी धुळे कार्यालयातील अधिकारी यांच्या करिता तक्रारदार यांच्याकडे पैशांची मागणी करून सदर लाचेची रक्कम एमआयडीसी धुळे कार्यालयाजवळ स्वीकारताना रंगेहात मिळून आला. त्याच्या विरुद्ध रात्री उशिरा भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.