नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
कल्याण/प्रतिनिधी – आदिवासींसाठी वन हक्क मान्यता कायदा लोकसभे मध्ये पारित होऊन तब्बल 18 वर्षाचा कालावधी उलटला मात्र स्थानिक आदिवासी बांधवांना वनपट्टे दिले जात नाहीत आणि काहींना वनपट्टे जरी दिलेले असले तरी त्यात खूप मोठ्या प्रमाणामध्ये चुका आहेत, यासाठी आज आदिवासी श्रमिक मुक्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली शहापूर,मुरबाड, कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील आदिवासी बांधवांकडून कल्याण प्रांत कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलकानी शासनाने वनपट्टे जरी दिलेले असले तरी त्यात खूप मोठ्या प्रमाणामध्ये चुका आहेत, त्यात वारस नोंदी, गाव दुरुस्ती ,नाव दुरुस्ती किंवा सर्वे नंबर दुरुस्ती असेल या सर्व दुरुस्त्या व्हाव्यात आणि त्यांना योग्य तो न्याय मिळावा यासाठी वन हक्क धारकांना सातत्याने निवेदने आंदोलन करावी लागतात आहेत पण त्या काहीही उपयोग झालेला नाही यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी आज धरणे आंदोलन करण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले आहे.