नेशन न्यूज मराठी टीम.
हिंगोली / प्रतिनिधी – सध्या इंटरनेटचे युग असून अनेक जण मोबाईल फोनचा जास्त वापर करत आहेत. याच मोबाईल फोनवर, इंटरनेटवर अनेकवेळा ऑनलाईन रम्मी, जुगाराच्या दिवसभरात जाहिराती अभिनेत्यांकडून केल्या जात असल्याने तरुण वर्ग रम्मी सारख्या विविध अॅपवर जुगार खेळत आहेत. यामध्ये अनेकांनी पैसे हारल्यामुळे आत्महत्या देखील केल्या आहेत.
ऑनलाईन जुगार अॅपवर बंदी घालून जाहिरात बाजी करणाऱ्या सर्व अभिनेत्यांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी करत हिंगोलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिला तसेच नागरीकांनी धरणे आंदोलन केले. या आंदोलनात हिंगोली जिल्ह्यातील विविध गावांतील महिला तसेच मुनिर पठाणसह अनेकजण उपस्थित होते.