नेशन न्यूज मराठी टीम.
बीड / प्रतिनिधी – बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सामाजिक कार्यकर्त्यांनी झाडांना गाजर लटकवून लक्षवेधी आंदोलन करण्यात आले आहे. गाजर हलवा आंदोलन करीत या आंदोलकांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले आहे. “धनु भाऊंची तरा न्यारी, जिल्ह्यापेक्षा तालुका भारी” या आशयाच्या घोषणेने परिसरात लक्ष वेधले होते.
धनंजय मुंडे यापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री होते. सध्या ते कृषिमंत्री असून पालकमंत्री पदाची अधिकृत घोषणा झाली नसली तरी जिल्ह्याचे निर्णय त्यांच्या संमतीने होतात. या परिस्थितीत इतर तालुक्यांपेक्षा परळी मतदारसंघास झुकते माप दिले जाते. आणि याकडे लक्ष वेधण्याकरिता गाजर हलवा आंदोलन करण्यात आले. दुष्काळ जाहीर करावा यासह शासन आपल्या दारी कार्यक्रमावरील कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी थांबवली जावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.