नेशन न्यूज मराठी टीम.
अमरावती / प्रतिनिधी – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात अमरावतीत धनगर बांधव चांगलेच आक्रमक झाले आहेत. तर आज धनगर समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्काजाम आंदोलन करत टायर आणि पोस्टर जाळून निषेध नोंदवण्यात आला असून मंत्री विखे पाटील यांनी सात दिवसात राजीनामा द्यावा, अन्यथा धनगर समाज मेंढरं घेऊन मंत्रालयात घुसणार, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळणाऱ्या धनगर तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी धनगर समाज आज चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत असून कपाळावर भंडारा लावून धनगर बांधव आंदोलनात सहभागी झाले होते.