डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – डोंबिवलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला व छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून ६५ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने शासनाकडून सार्वजनिक कार्यक्रमांना काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. यामुळे कोरोनाचे सर्व नियम पाळून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक संवर्धन संस्था आयोजित भारतीय बौद्ध महासभा, डोंबिवली शाखेच्या वतीने धम्म वंदना व सुत्रपठण घेण्यात आले तसेच समता सैनिक दलातर्फे बाबासाहेबांच्या स्मारकास मानवंदना देऊन, धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमासाठी स्मारक संवर्धन संस्थेतर्फे स्मारकाचे सुंदर सुशोभीकरण करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भारतीय बौद्ध महासभा, डोंबिवली शाखाध्यक्ष संजय खराटे गुरुजी यांनी भाषविले, स्मारक संवर्धन संस्थेचे अध्यक्ष रविकिरण मस्के आणि संजय खराटे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. समता सैनिक दलाचे डिस्ट्रिक्ट डिव्हिजन ऑफिसर गौतम खंदारे यांच्या नेतृत्वात रुस्तम कांबळे आणि आम्रपाली कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली समता सैनिक दलाच्या 30 सैनिकांच्या तुकडीने संचलन करून बाबासाहेबांच्या स्मारकास मानवंदना दिली. संजय खराटे, गौतम सुतार व साहेबराव वाघ यांनी धम्म वंदना व सुत्रपठण केले. रविकिरण मस्के व संजय खराटे यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी अनेक राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक , शैक्षणिक व धार्मिक संस्थांचे कार्यकर्ते आणि डोंबिवलीतील उपासक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक मान्यवर व्यक्तींचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन स्मारक संवर्धन संस्था सचिव गौतम सुतार यानी केले तर आभार प्रदर्शन खंदारे संरक्षण उपाध्यक्ष अशोक वाव्हळे गुरुजी संरक्षण विभाग सचिव भीमराव नेतने गुरुजी यांनी केले.स्मारकाचे सुशोभीकरण आणि यशस्वी नियोजन सुरेंद्र ठोके, मिलिंद साळवे, निलेश कांबळे आणि योगेश सुतार, विजय इंगोले,बाजीराव माने,राज सोनावणे, उमेश सुतार यांनी केले.