नेशन न्यूज मराठी टीम.
वर्धा/प्रतिनिधी – वर्ध्यात ग्रामरोजगार सेवकांच्या वतीने न्याय व हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा परिषद वर धरणे आंदोलन व भव्य धडक मोर्चा काढण्यात आला या मोर्चात मोठ्या संख्येने ग्राम रोजगार सेवकांची उपस्थिती दिसून आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ हा मोर्चा जिल्हा परिषद तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
मार्च 2023 पासून ग्रामरोजगार सेवकांचे मानधन मिळाले नाही. सहा सहा महिने मानधन न मिळाल्यामुळे कुटुंब कसे चालवायचे हा प्रश्न ग्राम रोजगार सेवकांना पडतो 2017 पासून प्रवास भत्ता सुद्धा मिळाला नसल्याची खंत यावेळी ग्रामरोजगार सेवकांनी बोलून दाखवली. पंधरा दिवसाच्या जर मानधन मिळाले नाही तर तीव्र काम बंद आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला.