महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image राजकीय

कल्याण डोंबिवलीमध्ये विकास हरवल्यासारखा दिसतोय -गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

नेशन न्यूज मराठी टीम.

https://youtu.be/7zNXrCfrVAc

कल्याण – आगामी केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कल्याणात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यासाठी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड कल्याणात आल होते.आघाडी धर्म पाळणे हे ज्याच्या त्याच्या मनावर आहे. आम्ही आघाडी धर्म पाळतही आहोत आणि जाहीरपणे सांगतही आहोत की आघाडी करूया. आता त्यांच्या मनात काय आहे हे सांगण्यासाठी आपण काही ज्योतिषी नसल्याचे विधान राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केले.

कोणताही निर्णय घेण्यासाठी ही आढावा बैठक नव्हती. तर एकंदर परिस्थिती काय आहे ? कार्यकर्त्यांमधील उत्साह काय आहे हे जाणून घेण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी ही आढावा बैठक झाल्याचे आव्हाड यांनी सांगितले.

तर कल्याण डोंबिवलीमध्ये विकास हरवल्यासारखा दिसतोय. आपल्याला तो कुठेही दिसत नाहीये. तुम्हाला कुठे दिसत असल्यास आपल्याला तिकडे घेऊन चला असा टोलाही त्यांनी लगावला.

तर सध्या देशभरात हिजाबवरून निर्माण झालेल्या गदारोळाबाबत बोलताना ते म्हणाले की लोकांनी काय घालावं, काय खावं? कोणता पेहराव घालावा, हे ठरवणारे तुम्ही कोण? त्यापेक्षा केंद्र सरकारमध्ये मिनिस्टर फॉर ड्रेस डिझायनिंगसाठी एक मंत्री नियुक्त करा, म्हणजे हे सगळे प्रश्न मिटून जातील असा सल्लाही गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी दिला.
दरम्यान कल्याणात झालेल्या राष्ट्रवादीच्य या आढावा बैठकीला जिल्हाध्यक्ष जगन्नाथ (आप्पा) शिंदे, राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदुराव, आनंद परांजपे, महिला जिल्हाध्यक्ष सारिका गायकवाड आदी पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×