नेशन न्युज मराठी टीम.
मुंबई– मुंबईत 22 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात जवळपास 26 विधेयके चर्चेला घेण्यात येणार आहेत. यामध्ये प्रलंबित विधेयके पाच, प्रस्तावित (मंत्रिमंडळ मान्यता प्राप्त) 21 विधेयके अशी एकूण 26 विधेयके व अध्यादेश या अधिवेशनात मांडण्यात येणार आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सह्याद्री अतिथीगृह येथे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापाननंतर मंत्रिमंडळ बैठक झाली. त्यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. पत्रकारपरिषदेला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन कामकाजाचा कालावधी कमी निश्चित करण्यात आला आहे. अधिवेशनादरम्यान शुक्रवार दि. 24 डिसेंबर रोजी कामकाज सल्लागार समितीची बैठक घेऊन पुढील कामकाज कालावधीबाबत निर्णय घेण्यात येईल. तसेच या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवडही करण्यात येणार आहे. पुढील हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्यासाठी शासन सकारात्मक आहे, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी सांगितले.
या अधिवेशनामध्ये महत्वाचे शक्ति फौजदारी कायदा (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2020, हे विधेयक मांडण्यात येणार आहे. तसेच केंद्र सरकारने शेतकरी संबंधित तीन कायदे मागे घेतल्याने शेतकरी (सक्षमीकरण व संरक्षण) किंमत आश्वासन व कृषी सेवा करार (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2021, शेतकरी उत्पन्न व्यापार व वाणिज्य (प्रचालन व सुलभीकरण) (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2021, अत्यावश्यक वस्तू (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2021, ही विधेयके मागे घेण्यात येणार आहेत.
ओबीसी, एससी, एसटी आरक्षण हे संविधानाने दिलेले आहे. त्या हक्कांचे रक्षण केलेच पाहिजे हीच शासनाची भूमिका आहे. ओबीसी आरक्षणाबाबत मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी स्वतः विरोधी पक्षाच्या नेत्यांसह सर्व ओबीसी नेत्यांची बैठक घेतली होती. या आरक्षणाबाबत शासन सकारात्मक आहे, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती चांगली असून मुख्यमंत्री अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक आठवड्याला मंत्रिमंडळ बैठक होत आहेत. कोविडच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन आढावा बैठका होत असल्याचेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या मान्य करुन शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता, घरभाडे भत्त्यात वाढ आणि पगारातही वाढ देण्यात आली आहे. एसटी संपात सहभागी कर्मचाऱ्यांनी शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सेवेत रुजू व्हावे. टोकाचा निर्णय घेण्याची वेळ कर्मचाऱ्यांनी आणू नये. शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले. देशातील इतर राज्यांशी तुलना करता राज्यात मद्यावरील 300 टक्के कर होता. तो कमी केला आहे.
विद्यापीठांचे कुलगुरू नेमण्यात राज्यपालांचे अधिकार कमी करण्याचा प्रश्नच नसून याबाबत समिती गठीत करण्यात येणार आहे. या समितीकडून राज्य शासनाला पाच नावे सुचविण्यात येणार असून त्यापैकी दोन नावे निश्चित करून राज्यपालांकडे पाठविली जाणार आहेत. त्यातून राज्यपालांकडूनच कुलगुरुंची नियुक्ती होणार असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले.
सरकार अधिवेशनात उपस्थित होणाऱ्या सर्व मुद्द्यांवर चर्चा आणि उत्तरे देण्यास तयार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या चहापानासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र पाठवून चहापानाला सर्वांना बोलावले होते, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
गेल्या अनेक दिवसांपासून परीक्षासंदर्भात तक्रारी प्राप्त होत आहेत. या सर्व घटनांची सखोल चौकशी करण्यात येत असून याबाबतचा तपास सुरु आहे. कोणत्याही गैरप्रकाराला पाठीशी घातले जाणार नाही. या सर्व प्रकरणाबाबत पोलीस तपास सुरू असून पोलिसांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तत्काळ कार्यवाही करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
Related Posts
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सिरम इन्स्टिट्यूटच्या आगीची पाहणी
पुणे - सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या प्लँटमध्ये लागलेल्या आगीची उपमुख्यमंत्री अजित…
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दादा सामंत यांना श्रद्धांजली
प्रतिनिधी . मुंबई, दि. २२ : कामगार आघाडीचे माजी अध्यक्ष,…
-
एमपीएससीची भरती प्रक्रिया गतिमान करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई/प्रतिनिधी - एमपीएससी’चा कारभार गतिमान होऊन उमेदवारांना न्याय मिळण्यासाठी ‘एमपीएससी’…
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते साहसी जलतरणपटू नील शेकटकरचा सत्कार
मुंबई/प्रतिनिधी - एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडिया हे १५…
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन
पुणे/प्रतिनिधी - वानवडी, पुणे येथील नूतनीकरण केलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे…
-
महाराष्ट्र तांदूळ महोत्सवाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - शेतकरी ते थेट ग्राहक…
-
उल्हासनगर गोळीबार प्रकरणाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार - अजित पवार
NATION NEWS MARATHI ONLINE धुळे/प्रतिनिधी - उल्हासनगरमध्ये पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये…
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बँकांच्या ‘सीएसआर’ निधीतील कामांचे लोकार्पण
प्रतिनिधी. पुणे - विविध खासगी बँकांनी सामाजिक बांधिलकी राखत त्यांच्या…
-
भारत बायोटेक’च्या प्लॅन्टसाठी पुण्यात जागा देणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
मुंबई प्रतिनिधी- कोरोना संकटावर मात करण्यासाठी डॉक्टर, नर्सेस आदींसह राज्याची आरोग्य…
-
भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्राच्या पोलीस दलाला त्यागाची, बलिदानाची,…
-
राज्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा
मुंबई/ प्रतिनिधी - कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिकचा धोका…
-
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये, याबाबत विधिमंडळात सोमवारी विधेयक मांडणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई- ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…
-
सर्वच महामंडळाच्या मंजूर निधीचे तातडीने वितरण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या…
-
इलेक्ट्रिक थ्री-व्हिलर गाड्यांच्या वितरण सेवेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे/प्रतिनिधी - राज्यातील वाढते प्रदूषण व त्यामुळे निर्माण होणारे संभाव्य…
-
रायगड जिल्हात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा
अलिबाग/प्रतिनिधी - गेल्या वर्षीचे "निसर्ग" आणि यावर्षीचे "तौक्ते" चक्रीवादळ या…
-
नवी मुंबईत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते माथाडी भूषण पुरस्कारांचे वितरण
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - समाजातील सर्व घटकांना न्याय…
-
गृह विभागाच्या बळकटीकरणासाठी १ हजार २९ कोटींची तरतूद -उपमुख्यमंत्री अजित पवार
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक - गृह विभागाच्या बळकटीकरणासाठी कुठल्याही प्रकारची…
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सन २०२२-२३ चा अर्थसंकल्प विधानसभेत मांडला
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास,…
-
ठाणे जिल्ह्यात तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन व विक्रीस बंदी
ठाणे- (संघर्ष गांगुर्डे) जिल्ह्यामध्ये तंबाखु व तंबाखुजन्य धुम्रपानाचे पदार्थ इत्यादीची…
-
दहावी व बारावीच्या परीक्षेसंदर्भात मुंबई विभागासाठी नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात…
-
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात…
-
पुणे मेट्रोच्या ईस्ट-वेस्ट कॉरिडॉरच्या ट्रायल रनचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे/प्रतिनिधी - पुणे ही महाराष्ट्राची शैक्षणिक, सांस्कृतिक राजधानी आहे. औद्योगिक…
-
भाजपासोबत गेल्यानंतर अहंकार येतो - रोहित पवार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. भंडारा/प्रतिनिधी - भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात…
-
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय व एशियाटिक सोसायटीतील दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखित होणार डिजिटल
मुंबई/प्रतिनिधी - मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातील दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखितांचे आणि…
-
मागासवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीअर्ज व नुतनीकरणासाठी मुदतवाढ
नेशन न्युज मराठी टीम. ठाणे- अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे…
-
अजित पवार गटाचे जोडे मारो निषेध आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - भाजप नेते…
-
डोमेसाईल दाखल्यावरील INDIA व Citizen of india ही अक्षरे मोठी व गडद करण्याची मागणी
प्रतिनिधी. सोलापूर - सेतू मधून देण्यात येणार्या डोमेसाईल दाखल्यावरील INDIA…
-
मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये गणेशमूर्तींचे प्रदर्शन व विक्री
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - महाराष्ट्र लघु…
-
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमासाठी आवाहन
प्रतिनिधी. औरंगाबाद - भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2020-21 या…
-
पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयात विविध जागांसाठी भरती
पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयात विविध जागांसाठी भरतीTeam DGIPR द्वारापदाचे नाव – जतन…
-
महाप्रित व आय.आय.टी. मुंबई यांच्यात कार्बन कॅप्चरिंग व ग्रीन हायड्रोजन तंत्रज्ञानाबाबत सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा…
-
३० व ३१ ऑक्टोबरला एमपीएससी परीक्षार्थी व परीक्षेचे काम पाहणाऱ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)परीक्षा 31 ऑक्टोबर 2021 रोजी…
-
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागतर्फे अनुसूचित जाती, इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सामाजिक न्याय व विशेष…
-
राष्ट्रीय क्रीडा व साहसी पुरस्कार प्रदान,महाराष्ट्रातील ११ खेळाडू व ३ संस्थांचा समावेश
नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय युवा कल्याण तथा क्रीडा मंत्री अनुराग…
-
भूदान व ग्रामदान जमिनींसाठी अभ्यास समिती नियुक्त
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील भूदान व ग्रामदान…
-
डोंबिवली पेंढारकर कॉलेज व घरडा सर्कल परिसरात प्रायोगिक तत्वावर सम विषम व नो पार्किंग
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील…
-
कल्याण मध्ये अजित पवार यांच्या विरोधात भाजपची निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भात विरोधी पक्षनेते…
-
अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी…
-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्रात ६१५ खाटांचे रुग्णालय व नवीन पदव्युतर अभ्यासक्रम सुरु होणार
मुंबई/प्रतिनिधी - नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्रात…
-
लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ग्रामीण विकास व संशोधन समिती मार्फत पदवी व पदविका अभ्यासक्रम राबविण्यात येणार
मुंबई/प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अनेक वर्षे केवळ कागदावर…
-
भेंडी दिन व भेंडी लागवड प्रशिक्षण संपन्न
कल्याण प्रतिनिधी - कल्याण तालुक्यामध्ये मौजे पोई येथे तालुका कृषी अधिकारी कल्याण यांचे मार्फत भेंडी दिन व शेतकरी प्रशिक्षणनुकतेच…
-
तृतीयपंथीय व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्रासाठी राष्ट्रीय पोर्टल सुरु
मुंबई/प्रतिनिधी - सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडून तृतीयपंथीय…
-
चित्रपट अभिनेत्री नयन पवार यांचा कलाकारांना मदतीचा हात
मुंबई/प्रतिनिधी- राज्यात सध्या कोरोनामुळे लॉक डाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे…
-
आदिवासी आश्रम शाळा व कर्मचारी यांचे आंदोलन
नेशन न्यूज' मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - आदिवासी विकास…
-
केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात आयटकची संघर्ष यात्रा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. https://youtu.be/ifbnhFjFUyE?si=qgXi4-znvb1R0NJW रत्नागिरी/प्रतिनिधी - केंद्र व…
-
शेतकरी व कष्टकरी जनतेचा बुलंद आवाज हरपला
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – “शेतकरी व कष्टकरी जनतेचा…
-
केंद्र व राज्य सरकारवर सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - बीडच्या अंबाजोगाईत…