महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image ताज्या घडामोडी महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सिरम इन्स्टिट्यूटच्या आगीची पाहणी

पुणे –  सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या प्लँटमध्ये लागलेल्या आगीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली. आग नेमकी कशामुळे लागली या संदर्भात उद्या अत्यंत बारकाईने ऑडिट करण्यात येणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

सिरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन लागलेल्या आगीच्या दुर्घटनेची माहिती घेतली. यावेळी आमदार चेतन तुपे, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व वरिष्ठ  पोलीस अधिकारी उपस्थित होते. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींबाबत उप मुख्यमंत्री श्री. पवार यांनी दु:ख व्यक्त केले.आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान वेळेत पोहचले. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.

Translate »
×