पुणे/प्रतिनिधी – पुणे ही महाराष्ट्राची शैक्षणिक, सांस्कृतिक राजधानी आहे. औद्योगिक राजधानी म्हणूनही पुण्याने ओळख निर्माण केली आहे. ऐतिहासिक नगरी म्हणूनही पुण्याकडे बघितले जाते, या ऐतिहासिक नगरीचा, आधुनिक इतिहास लिहिताना पुणे मेट्रो रेल्वेच्या कामाचा, आजच्या ट्रायल रनचाही उल्लेख करावा लागेल. ‘मेट्रो’मुळे पुण्याला नवी, आधुनिक ओळख मिळणार आहे. पुण्याच्या विकासाचे आणखी एक स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर येऊन पोहोचले असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज केले. पुणे मेट्रोने उर्वरित काम जलद गतीने पूर्ण करावे. कोणत्याही परिस्थितीत मेट्रोच्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशीही ग्वाही त्यांनी दिली.
पुणे महानगरपालिका क्षेत्रातील वनाज ते रामवाडी कॉरिडॉरमधील पूर्ण झालेल्या मार्गिकेवरील पुणे मेट्रोच्या ईस्ट-वेस्ट कॉरिडॉरच्या ट्रायल रनचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिरवा झेंडा दाखवून सकाळी सात वाजता केले. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, सभागृह नेते गणेश बिडकर, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आमदार चंद्रकांत पाटील व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे उपस्थित होते.
अत्याधुनिक, आरामदायी प्रवासाचे जलद व वेळेवर पोहोचवणाऱ्या वाहतूक व्यवस्थेचे स्वप्न पूर्ण करणारी ट्रायल रन ठरणार असल्याचे सांगून उपुमख्यमंत्री श्री अजित पवार म्हणाले, पुणेकरांना निर्धारित वेळेत इच्छित ठिकाणी पोहोचवणाऱ्या वाहतूक व्यवस्थेसोबतच पुणेकरांचे वेळेचे गणित जुळवून आणणाऱ्या वाहतूक आधुनिक व्यवस्थेची ही ट्रायल रन आहे. या ट्रायल रनच्या निमित्ताने पुणेकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. महामेट्रोच्या माध्यमातून पुणे शहरात सुरु असणारे मेट्रो रेल्वेचे काम निर्णायक टप्प्यावर आहे. लॉकडाऊनच्या काळातही काम सुरु होते. 60 टक्के काम आजच्या घडीला पूर्ण झाले आहे. अत्यंत वेगाने, विश्वासाने, निर्धाराने,कोणताही अपघात न होता, हे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. यात महामेट्रोच्या, पुणे मेट्रोच्या सर्व इंजिनियर, अधिकारी, कर्मचारी बांधवांची मोठी मेहनत असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे मेट्रोची, सगळ्या मार्गांची कामे पूर्ण होऊन, ही मेट्रो सेवा पूर्ण क्षमतेनं सुरु झाल्यानंतर, सायकल, मोटरसायकल, दुचाकीचं शहर अशी ओळख असणारं पुणे शहर, हे मेट्रो वाहतुकीचं शहर म्हणून ओळखलं जाईल. पुणे मेट्रोमुळे रस्त्यांवरचा वाहनांचा, वाहतुकीचा, प्रदूषणाचा ताण कमी होईल. वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल. पुणेकर त्यांच्या निर्धारित ठिकाणी, निर्धारित वेळेत पोहचू शकतील, दुसऱ्याला दिलेली वेळ आणि वेळेचं गणित, पुणेकर भविष्यात पाळू शकतील, असा विश्वास व्यक्त करतानाच मेट्रो रेल्वेसेवा ही प्रदूषणविरहीत सेवा असल्याने प्रदूषण होणार नाही. रस्त्यांवरची वाहने कमी झाल्याने, त्या माध्यमातून होणारे प्रदूषणही कमी होईल. पुणे शहर आणि परिसरातली वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी पुण्याभोवती रिंग रोडचे नियोजन आहे. वाहतुकीची समस्या हीच पुणे शहराची प्रमुख समस्या आहे. पुणे मेट्रोच्या माध्यमातून ती काही प्रमाणात निश्चितच सुटेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कोणत्याही परिस्थितीत पुणे मेट्रोच्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही देत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,पुणे मेट्रो पुणे शहरातून ३३.२० किलोमीटर अंतर धावणार आहे. या मेट्रोलाईनवर ३० मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. या एकूण लांबीपैकी, २७.२८ किलोमीटर मेट्रो रस्त्याच्या समांतर पुलावरुन धावणार आहे. तर पुण्याच्या खालून बोगद्यातून ६ किलोमीटर मेट्रो धावणार आहे. आतापर्यंत पुणे मेट्रोचं एकूण काम जवळपास ६० टक्के पूर्ण झालं आहे. पुणे मेट्रोनं उर्वरित काम जलद गतीनं पूर्ण करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे महानगर विकास प्राधिकरण व महानगर नियोजन समितीच्या बैठकीत, पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या प्रारूप विकास आराखड्याच्या प्रसिध्दीसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे पुण्याला, सर्वोत्तम महानगर विकसित करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. या विकास आराखड्यात २ रिंगरोड, हायस्पीड रेल्वे व क्रिसेंट रेल्वे, १० मेट्रो मार्गिका, १३ मल्टी मॉडेल हब, ४ प्रादेशिक केंद्रे, १५ नागरी केंद्रे, १२ लॉजिस्टिक केंद्रे, ५ पर्यटन स्थळ व ३ सर्किट्स, ५ शैक्षणिक केंद्रे, २ वैद्यकीय संशोधन केंद्रे व ७ अपघात उपचार केंद्रे, जैव विविधता उद्यान, कृषी प्रक्रिया संशोधन व विकास केंद्रे, १ क्रिडा विद्यापीठ, ८ ग्रामीण सबलीकरण केंद्रे, ५९ सार्वजनिक गृह प्रकल्प, २६ नगर रचना योजना, ४ कृषि उत्पन्न बाजार केंद्रे, ५ प्रादेशिक उद्याने, ८ जैव विविधता उद्याने व १६ नागरी उद्याने, ४ अक्षय उर्जा निर्मिती केंद्रे, ३० अग्निशमन केंद्रे, २ औद्योगिक संशोधन व प्रशिक्षण केंद्र, १ व्यवसाय केंद्र असे महत्वाचे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत.पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे एकूण क्षेत्र ६ हजार ९१५ चौ.कि.मी. असून हे क्षेत्र राज्यातील सर्वात मोठे आणि देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे क्षेत्र असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलमताई गोऱ्हे यावेळी म्हणाल्या, पुणे मेट्रोमुळे पुणेकरांचा प्रवास सुलभ व सुरक्षित होणार आहे, आयटीचे क्षेत्र म्हणून पुणे शहर प्रभाव वाढवते आहे, त्यात मेट्रोची भर पडणार आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी मेट्रो निश्चितपणे महत्त्वपूर्ण ठरेल, दिल्ली, नागपूरकरांचा मेट्रोचा अनुभव चांगला आहे, आता हाच अनुभव पुणेकरांना अनुभवण्यास मिळणार असल्याचा उल्लेख त्यांनी केला.महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुणे महानगरात मेट्रो ट्रायल रन हा ऐतिहासिक क्षण आहे. केंद्र व राज्य शासनाने मेट्रोच्या कामाला गती दिल्याने हा क्षण आज अनुभवता आला. पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विचार करता आजची मेट्रो ट्रायल रन महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुणे महानगरात मेट्रो ट्रायल रन हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे. डिसेंबर 2022पर्यंत मेट्रोचे सर्व मार्ग सुरू होतील, वाहतूक कोंडी कमी होईल. असे त्यांनी सांगितले.प्रास्ताविक महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी केले. यावेळी कोरोनाचे निर्बंधाचे पालन करून मेट्रोचे अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
- देशातील सर्वात हलके मेट्रो कोच:
* कमी वजनाच्या अॅल्युमिनियम बॉडीसह बनलेले.
* डिझाइन गती 95 किमी प्रतितास.
* प्रवासी क्षमता 975 पॅक्स / 3 कार ट्रेन (6 कारसाठी विस्तारित करण्याची क्षमता)
- सुरवातीपासून सौर ऊर्जेचे एकत्रीकरण:
* 11.19 मेगावॅटएकूण सौर उर्जा स्थापित करण्याची योजना.
* त्यामुळं प्रति वर्षी 20 कोटींची बचत.
* दर वर्षी अंदाजे 25 हजार टन कार्बनडायऑक्साईड उत्सर्जनापासून सुटका.
- नाविन्यपूर्ण यूजी स्टेशनची रचना: एनएटीएम (न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड)
* दोन मेट्रो स्थानके: मंडई व बुधवारपेठ मेट्रो स्थानकांना या तंत्रज्ञानाचा वापर करून बांधणार.
* या तंत्रज्ञानाच्या वापरामुळं जागेची बचत झाली.
* शहरातील सुमारे 200 रहिवाशांचे पुनर्वसन टाळले.
- 4. ‘कचरे से कांचन तक’डम्पिंग साइटचे डेपोमध्ये रूपांतर :
* कोथरूड कचरा डम्पिंग साइट १२.२ हेक्टर क्षेत्रामध्ये पसरली आहे.
* 3 लाख 80 हजार घनमीटर कचरा असणाऱ्या या जागेची रुपांतर सुंदर परिसरात होणार.
- कार्यक्षम पाणी व्यवस्थापन :
*सांडपाण्यावर 100 टक्के प्रक्रीया करण्यासाठी ‘अनॅरोबिक बायोडायजेस्टर तंत्रज्ञाना’चा वापर करण्यासाठी ‘डीआरडीओ’सोबत सामंजस्य करार.
*बहुतांश स्थानकांमधून मनपाच्या गटारलाईनमध्ये सांडपाणी सोडण्यात येणार नाही.
*प्रत्येक स्टेशनवर रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविणार.
- वृक्षारोपण आणि पुनर्रोपण :
* शक्यतो झाडे तोडायची नाहीत ही महामेट्रोची पॉलिसी आहे, नाईलाजाने झाडे काढण्याची वेळ आल्यास ती न तोडता त्या झाडांचं ‘रुट बॉल’ पध्दतीनं पुनर्रोपण करण्यात येते.
* पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत 1 हजार 698 झाडांच पुनर्रोपण तर 11 हजार 683 नवीन झाडांची लागवड करण्यात आली.
- ‘पीपीपी’ तत्वावर पार्किंग कम कमर्शियल डेव्हलपमेंट नियोजित ठिकाण :
*स्वारगेट मल्टी-मोडल ट्रान्सपोर्ट हब – 2.10 दशलक्ष चौरस फूट क्षेत्र.
*सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्टेशन – 1.02 दशलक्ष चौरस फूट क्षेत्र.
*रेंज हिल डेपो -2.09 दशलक्ष चौरस फूट क्षेत्र.
*हिल व्ह्यू कार पार्क डेपो, कोथरूड –1.87 दशलक्ष चौरस फूट क्षेत्र.
Related Posts
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन
पुणे/प्रतिनिधी - वानवडी, पुणे येथील नूतनीकरण केलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे…
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सिरम इन्स्टिट्यूटच्या आगीची पाहणी
पुणे - सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या प्लँटमध्ये लागलेल्या आगीची उपमुख्यमंत्री अजित…
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दादा सामंत यांना श्रद्धांजली
प्रतिनिधी . मुंबई, दि. २२ : कामगार आघाडीचे माजी अध्यक्ष,…
-
एमपीएससीची भरती प्रक्रिया गतिमान करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई/प्रतिनिधी - एमपीएससी’चा कारभार गतिमान होऊन उमेदवारांना न्याय मिळण्यासाठी ‘एमपीएससी’…
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते साहसी जलतरणपटू नील शेकटकरचा सत्कार
मुंबई/प्रतिनिधी - एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडिया हे १५…
-
पुणे स्मार्ट सिटी वाॕर रुमला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट
प्रतिनिधी. पुणे,दि.२२-पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट अंतर्गत कार्यन्वित केलेल्या वाॕर रुम…
-
उल्हासनगर गोळीबार प्रकरणाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार - अजित पवार
NATION NEWS MARATHI ONLINE धुळे/प्रतिनिधी - उल्हासनगरमध्ये पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये…
-
पुणे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडून पहाणी
प्रतिनिधी . पुणे - निसर्ग' चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या पुणे जिल्ह्याच्या…
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बँकांच्या ‘सीएसआर’ निधीतील कामांचे लोकार्पण
प्रतिनिधी. पुणे - विविध खासगी बँकांनी सामाजिक बांधिलकी राखत त्यांच्या…
-
भारत बायोटेक’च्या प्लॅन्टसाठी पुण्यात जागा देणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
मुंबई प्रतिनिधी- कोरोना संकटावर मात करण्यासाठी डॉक्टर, नर्सेस आदींसह राज्याची आरोग्य…
-
भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्राच्या पोलीस दलाला त्यागाची, बलिदानाची,…
-
राज्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा
मुंबई/ प्रतिनिधी - कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिकचा धोका…
-
सर्वच महामंडळाच्या मंजूर निधीचे तातडीने वितरण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या…
-
इलेक्ट्रिक थ्री-व्हिलर गाड्यांच्या वितरण सेवेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे/प्रतिनिधी - राज्यातील वाढते प्रदूषण व त्यामुळे निर्माण होणारे संभाव्य…
-
रायगड जिल्हात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा
अलिबाग/प्रतिनिधी - गेल्या वर्षीचे "निसर्ग" आणि यावर्षीचे "तौक्ते" चक्रीवादळ या…
-
अजित पवार गटाचे जोडे मारो निषेध आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - भाजप नेते…
-
कल्याण मध्ये अजित पवार यांच्या विरोधात भाजपची निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भात विरोधी पक्षनेते…
-
गृह विभागाच्या बळकटीकरणासाठी १ हजार २९ कोटींची तरतूद -उपमुख्यमंत्री अजित पवार
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक - गृह विभागाच्या बळकटीकरणासाठी कुठल्याही प्रकारची…
-
शरद पवार गटाकडून अजित पवारांच्या प्रतिमेलाला जोडो मारो आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. धुळे/प्रतिनिधी - केंद्रीय निवडणूक आयोगाकडून…
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सन २०२२-२३ चा अर्थसंकल्प विधानसभेत मांडला
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास,…
-
कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक जयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन
प्रतिनिधी. पुणे - कोरेगाव भीमा येथील जयस्तंभास अभिवादन करुन त्या ऐतिहासिक…
-
अजित पवार गटाचा नवचेतना मेळावा, बॅनरवरून शरद पवारांचे फोटो गायब
नेशन न्यूज मराठी टिम. अमरावती/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची चर्चा…
-
पुणे -नाशिक हाय स्पीड रेल्वेला केंद्राची तत्त्वतः मंजुरी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - पुणे -नाशिक या…
-
महाराष्ट्र तांदूळ महोत्सवाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - शेतकरी ते थेट ग्राहक…
-
आयबीसेफची मागणी,अजित पवार यांना आरक्षण समितीच्या अध्यक्षपदावरून हटवा
सोलापूर/प्रतिनिधी - मागासवर्गीयांचे पदोन्नती मधील आरक्षणासाठी सरकारने मंत्री गट सामिती…
-
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये, याबाबत विधिमंडळात सोमवारी विधेयक मांडणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई- ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…
-
वारकऱ्यांमध्ये अजित पवार यांचा दुजाभाव,विदर्भातील वारकऱ्यांना ही परवानगी देण्यात यावी - प्रकाश आंबेडकर
प्रतिनिधी. पुणे - आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाऊन आपल्या विठोबाचे…
-
हिवाळी अधिवेशनात २६ विधेयके व अध्यादेश मांडणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- मुंबईत 22 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या…
-
अजित पवार पदासाठी नाही मग कशासाठी सत्तेत गेले, हे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे - विजय वडेट्टीवार
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर / प्रतिनिधी - सध्या सुरु…
-
पुणे येथे होणार साखर संग्रहालय
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्राचे साखर उद्योगातील स्थान विचारात घेता जागतिक दर्जाचे…
-
पुणे येथे सहाव्या कमांडंट्स बैठकीचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पुणे/प्रतिनिधी - एकात्मिक संरक्षण कर्मचारी…
-
पुणे म्हाडाच्या ४२२२ घरांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकृतीचा शुभारंभ
पुणे/प्रतिनिधी - पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ अर्थात, पुणे म्हाडाच्या…
-
पुणे कमांड रुग्णालयात कर्करोग उपचार केंद्राचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - पुण्यातील कमांड रुग्णालयात 30…
-
भाजपासोबत गेल्यानंतर अहंकार येतो - रोहित पवार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. भंडारा/प्रतिनिधी - भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात…
-
आता पुणे ते बँकॉक थेट विमानसेवा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय नागरी विमान…
-
पुणे बार्टीमार्फत ऑनलाईन एमपीएससी मुख्य परीक्षा मार्गदर्शन
मुंबई प्रतिनिधी- डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे…
-
पुणे विभागातून आषाढी वारीसाठी ५३० बसेसची सेवा
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - यंदाच्या आषाढी वारीसाठी महाराष्ट्र…
-
‘महाप्रित’ आणि पुणे नॉलेज क्लस्टर यांच्यात सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा…
-
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुणे विधानभवन प्रांगणात मुख्य ध्वजारोहण
प्रतिनिधी. पुणे- जिल्ह्याचे मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या…
-
जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे-अहमदनगर महामार्गावरील वाहतुकीत बदल
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - हवेली तालुक्यातील मौजे पेरणे…
-
पुणे शहर कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती
प्रतिनिधी. मुंबई, दि. २७ :- पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक कार्यवाही…
-
पुणे महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू
मुंबई /प्रतिनिधी – पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग…
-
पुणे येथे राज्य महिला आयोगाकडून २८ ते ३० जूनदरम्यान जनसुनावणी
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - महाराष्ट्र राज्य महिला आयोगातर्फे…
-
पुणे म्हाडाच्या ५ हजार २११ घरांच्या सोडतीचा शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी…
-
पुणे जिल्ह्यात येरवडा येथे नवीन आयटीआय सुरू करण्यास मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई -पुणे जिल्ह्यातील येरवडा येथे औद्योगिक…
-
चित्रपट अभिनेत्री नयन पवार यांचा कलाकारांना मदतीचा हात
मुंबई/प्रतिनिधी- राज्यात सध्या कोरोनामुळे लॉक डाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे…
-
पुणे सिटी इलेक्ट्रिक व्हेईकल एक्सेलरेटर कार्यशाळेच्या समारोप
नेशन न्युज मराठी टीम पुणे - जगाला आज हरित ऊर्जेची…