Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image राजकीय

डोंबिवली मधील अवैध धंदे बंद करून संबंधितांवर कारवाई करण्याची वंचितची मागणी

डोंबिवली प्रतिनिधी – डोंबिवली शहरातील रामनगर, टिळक नगर, मानपाडा, विष्णूनगर या पोलीस स्टेशनं हद्दीत चालणारे गावठी दारू, मटका, लॉटरी, क्लब, जुगार, गांज्या व गुटखा विक्री तेजीत सुरु असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे समाजातील सर्वच स्तरावरील सामान्य व्यक्ती ज्यांचे हातावर पोट आहे अल्पवयीन मुले या घातक व्यसनाचे शिकार होत आहे त्यातून गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. तरी महोदय आपल्या नियंत्रण कक्षेत असलेल्या चारही पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालणारे अवैद्य धंद्यावर तात्काळ कारवाई करा व दोषींवर कठोर कारवाई करा अन्यथा वंचित बहुजन आघाडी डोंबिवली शहर कमिटी वतीने आपल्या कार्यलयावर आंदोलन केले जाईल असे निवेदन सहाय्यक पोलीस आयुक्त डोंबिवली यांना देण्यात आले. सदर निवेदन लिपिक सीमा बेडेकर म्याडम यांनी स्वीकारले या वेळी सुरेंद्र ठोके डोंबिवली शहर पु अध्यक्ष, मिलिंद साळवे महासचिव, राजू काकडे उपाध्यक्ष, एजाज खान उपाध्यक्ष, बाजीराव माने सचिव, अर्जुन केदार संघटक, अमीर शेख सदस्य हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X