सोलापूर/अशोक कांबळे – जिल्हा परिषद सोलापूरच्या वतीने पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०२०-२१ या वर्षांमध्ये अनुसूचित जाती-जमातीच्या वैयक्तिक लाभाच्या योजना सुरू झाल्या असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन मोहोळ पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रदीप ननावरे यांनी केले आहे.पात्र लाभार्थ्यांनी ४ ऑगस्ट २०२१ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात करण्यात आले आहे.पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या योजनेत विशेष घटक योजनेअंतर्गत अनुसूचित जाती/नवबौध्द लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदानावर दोन दुधाळ जनावरांचे गट वाटप करणे,आदिवासी क्षेत्राबाहेरील उपाययोजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना ७५ अनुदानावर १०+१ शेळी गट वाटप करणे,आदिवासी क्षेत्राबाहेरील उपाययोजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदानावर दोन दुधाळ जनावरांचे गट वाटप करणे,शेतकऱ्यांना सुधारित ५० टक्के अनुदानावर १०० एकदिवसीय सुधारित जातीची कुक्कुट पालनासाठी कोंबडीची पिल्ले वाटप योजना राबविण्यात येत आहेत. या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज ५ जुलै २०२१ पासून पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती, तसेच नजीकचा पशुवैद्यकीय दवाखाना,जिल्हा परिषदच्या WWW.ZPSolapur या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
या योजनेसाठी फोटो ओळखपत्र आधार कार्ड,मतदान ओळखपत्र,अपंग असल्यास अपंग प्रमाणपत्र,दारिद्रय रेषेचा दाखला,७/१२ व ८ अ उतारा,ग्रामपंचायत नमुना नं.८ ,जातीचा दाखला,रेशन कार्ड,अपत्य दाखला,बचत गट सदस्य प्रमाणपत्र ,रोजगार कार्ड व प्रशिक्षण घेतले असल्यास शेळी पालन,गोपालन प्रमाणपत्र ही कागदपत्रे सादर करावीत असे पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रदीप रणावरे यांनी केले आहे.इच्छुक पात्र लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन मोहोळ पंचायत समितीचे सभापती व पंचायत समिती सदस्य,गटविकास अधिकारी गणेश मोरे यांनी केले आहे.