नेशन न्यूज मराठी टिम.
नागपूर/प्रतिनिधी– नागपूर जिल्ह्यात यंदा मागील वर्षीच्या तुलने डेंग्यू रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. जुलैमध्ये महिन्याभरात जिथे 80 नवीन रुग्ण मिळून आले होते, तेच ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात 60 च्या घरात नवीन रुग्ण मिळून आले आहे. जानेवारी ते ऑगस्ट या महिन्यात एकूण 1250 संशयित रुग्णांपैकी 170 जणांना डेंग्यूची लागण झालेली आहे.
तीन संशयित रुग्णांचा मृत्यू झाला असून डेथ ऑडिटनंतर त्यांच्या मृत्यूच अधिकृत कारण कळेल अशी माहिती हिवताप अधिकारी डॉ. मंजुषा मठपती यांनी सांगितली आहे. यात शासकीय स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत. अनके ठिकाणी साफ सफाई न ठेवल्याने तसेच पावसाचं पाणी साचून डेंग्यूचे मच्छर होत असल्याने रुग्ण संख्या वाढताना दिसून येत आहे. अनेक घरात अजूनही कुलर सुरू आहे, त्यातही डेंग्यूचे मच्छर मिळून येत आहेत. त्यामुळे या मच्छरांना अंडी घालता येऊ नये म्हणून स्वच्छता ठेवा, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने केले जात आहे. तसेच विविध उपाययोजना केल्या जात आहेत.