नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम
खामगाव/प्रतिनिधी – राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची 5 डिसेंबर ला राजस्थान मधील जयपूर मध्ये गोळी मारून हत्या करण्यात आली. त्यांच्या या हत्येच्या निषेधार्थ आज खामगाव येथील टॉवर चौकातील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याजवळ सुखदेव सिंह गोगामेडी यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांची हत्या करणाऱ्या व हत्येचा कट रचणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, राष्ट्रीय करणी सेना व सकल राजपूत समाजाच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला.
राष्ट्रीय स्तरावरचे नेते सुखदेव सिंह गोगामेडी यांनी क्षत्रिय राजपूत समाजाला नेहमीच न्याय दिला आहे व त्यासाठी त्यांनी संघर्ष सुद्धा केला आहे. त्यांची हत्या करून संपूर्ण देशभरातील राजपुतांना हत्यारांनी चॅलेंज केली आहे. त्यामुळे तात्काळ त्यांच्या हत्या करणाऱ्या आरोपींना अटक करून त्यांच्या हत्येचा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा तसेच त्यांच्या हत्येचं षडयंत्र रचणाऱ्याला व हत्या करणाऱ्याला फाशीची शिक्षा द्यावी असे भारत सरकार व राजस्थान सरकारला निर्देश द्यावे अशी मागणी संपूर्ण राजपूत समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. सदरची मागणी पूर्ण न झाल्यास राजपूत समाजाकडून यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिला आहे.