नेशन न्यूज मराठी टीम.
बुलढाणा/प्रतिनिधी – मणिपुर हिंसाचाराने होरपळला आहे. जातीय तेढ निर्माण होऊन वाद विकोपाला गेला होता. त्यातच आदिवासी महिलांची धिंड काढली गेली होती आणि ह्याच घटनेमुळे देशभरातून संताप व्यक्त होत आहे. असे आमनवीय कृत्य केलेल्या नराधामांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशी मागणी महिलांनी केली आहे.
संपूर्ण मणीपुर घटनेचा आदिवासी समाज बांधवांच्या वतिने तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. एकलव्य संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकरी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. व जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी शेकडो आदिवासी बांधव उपस्थित होते.