नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
वर्धा/प्रतिनिधी – स्मार्ट प्रिपेड मिटरच्या योजनेस नागरिकांकडून विरोध होत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या वतीने वर्धा जिल्ह्याच्या वीज वितरण कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आहे. यामध्ये स्मार्ट प्रिपेड मीटर योजनेस सरकारने तात्काळ स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली आहे. स्मार्ट प्रीपेडचा प्रती मिटर खर्च हा १२ हजार रुपये लावण्यासाठी येतो. यामध्ये रिचार्ज करावा लागेल आणि रिचार्ज संपताच विद्युत पुरवठा खंडित होईल. अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी दिली. स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे सर्वसामान्य ग्राहकांचे आर्थिक बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. रिचार्ज संपल्यावर सर्वसामान्य व्यक्तींनी काय करावे? गरीबाला न्याय मिळालाच पाहिजेल, तानाशाही नही चलेगी अशा घोषणा देत वीज वितरण कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आले.