नेशन न्यूज मराठी टीम.
बुलढाणा/प्रतिनिधी – मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर देशात दोन कोटी रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते मात्र सरकारला नऊ वर्षापेक्षा जास्त वेळ होऊनही अजून रोजगाराचा प्रश्न कायम आहे, मोदी सरकारने फक्त जनतेला रोजगाराचे व विकासाचे गाजर दाखवले आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने बिरबलची खिचडी कधी शिजत नाही ती कोणाच्या ताटातही जात नाही तसे मोदी सरकार असल्याची टीका करत वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
यावेळी वकील, शिक्षक, डॉक्टर, इंजिनियर हे बेकार पडले असून त्यांना इतर व्यवसाय करावे लागत असल्याचे प्रतीकात्मक देखावे देखील साकारण्यात आले होते.यावेळी वंचितचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.
Related Posts
युद्ध बंदीची बातमी पहिल्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून का ऐकायला मिळाली ? ॲड. प्रकाश आंबेडकर