Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
ठाणे ताज्या घडामोडी

कल्याणात तलाव स्वच्छ करणाऱ्या रोबोटिक मशीनचे प्रात्यक्षिक

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/प्रतिनिधी – सध्या ए आय म्हणजेच आर्टिफिशयल इंटेलिजन्स वर आधारित तंत्रज्ञानाने जगभरात धुमाकूळ घातला आहे, या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित वेगवेगळ्या रोबोट आणि रोबोटिक मशीनची निर्मिती केली जात आहे, अशाच एका तलाव स्वच्छ करणाऱ्या रोबोटिक मशीनचे आज कल्याणात प्रात्यक्षिक दाखवण्यात आले, केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते,

हे मशीन भारतात पहिल्यांदाच दाखल झाले असून मुंबई महापालिकेनंतर कल्याण डोंबिवली महापालिकेत त्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले, कल्याण पश्चिमेच्या गौरी पाडा तलावात हे मशीन सोडून त्याद्वारे तलावात पडलेल्या कचऱ्याची स्वच्छता कशी केली जाऊ शकते, याचा डेमो कंपनीतर्फे दाखविण्यात आला. वजनाला अतिशय हलके असणारे हे मशीन जॉय स्टिक किंवा जीपीएस कनेक्टेड रिमोटमार्फत चालवले जाऊ शकते या मशीनमध्ये उच्च क्षमतेचा कॅमेरा बसवण्यात आला असून त्याद्वारे तलावात दूरवर पसरलेला कचराही सहजपणे गोळा केला जाऊ शकतो तर एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित हे तंत्रज्ञान असल्याने ऑटो प्रोग्रॅम केल्यानंतर कोणत्याही व्यक्ती विना हे मशीन तलावातील कचरा गोळा करत असल्याचे यावेळी कंपनीच्या प्रतिनिधींकडून सांगण्यात आले,
फ्रान्समधील आयडीज या कंपनीने जेलीफिश बोट नामक आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर चालणाऱ्या या रोबोटिक मशीनची निर्मिती केली आहे,

दरम्यान केडीएमसी आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी स्वतः जॉयस्टीक द्वारे हे मशीन चालून पाहिले, आणि या मशीनची आणि त्याच्या कामाची प्रशंसा केली, परंतु या मशीनची किंमत पाहता महापालिकेसाठी ही अतिशय खर्चिक बाब ठरू शकते असेही या कंपनी प्रतिनिधींना त्यांनी स्पष्ट केले,
यावेळी अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे, घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, ब प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत, महापालिका सचिव संजय जाधव उपस्थित होते,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X