नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण – मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास कल्याण डोंबिवली सह आसपासच्या परिसरात पूर परिस्थिती उद्भवते. या पार्शवभूमीवर कल्याण मध्ये एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले आहे. २५ जणांचे हे पथक अत्याधुनिक सामुग्रिने सज्ज आहे. आज कल्याण दुर्गाडी खाडीत या पथकाने प्रात्यक्षिके केली. या एनडीआरएफच्या टिमचे पथक प्रमुख निरीक्षक राजेश यावले यांनी आपल्या टीमसह आपत्कालीन परिस्थितीचा सामना कसा करणार याबाबत प्रत्याक्षिक सादर करण्यात आली.
मागील काही दिवसापासून ठाणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील पूर प्रवणतेचा विचार करता पुरपरिस्थिती, इमारत दरड कोसळणे , वाहतूक कोंडी तसेच इतर आपत्कालीन परिस्थितीतीत आपत्तींना सामोरे जाण्यासाठी मान्सून कालावधी करीता, बचावकार्यासाठी महाराष्ट्र शासनाचे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संचालक यांच्यामार्फत ठाणे जिल्ह्यासाठी एनडीआरएफच्या दोन पथकांची नेमणूक करण्यात आली असून त्यापैकी २५ जवानांची एक टीम कल्याण डोंबिवली महानगरपालिका उल्हासनगर व भिवंडी साठी देण्यात आली आहे. या टीम सोबत त्यांच्या सोबत ५ बोट, लाईफ बॉय, लाईफ जॅकेट यासह पूरपरिस्थितीमध्ये नागरिकांना वाचविण्यासाठी जे जे साहित्य आवश्यक आहे ते आमच्याकडे उपलब्ध असल्याची माहिती एनडीआरएफच्या टिमचे पथक प्रमुख निरीक्षक राजेश यावले यांनी दिली.