नेशन न्यूज मराठी टीम.
अहमदनगर/प्रतिनिधी – मणिपूर येथील आदिवासी महिलांवरील अमानवीय अत्याचार करणाऱ्यावर फाशीची शिक्षा आणि मणिपूर मुख्यमंत्री यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ.जालिंदर घिगे यांच्या नेतृत्वाखाली, राज्य समन्वयक ॲड.अरुण जाधव यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.आंदोलनाचे नियोजन पंकज खर्डे यांनी केले होते.यावेळी वंबआ जिल्हा महासचिव योगेश साठे,शहर जिल्हा उपाध्यक्ष मनोहर जिंदम,गणेश तडवी, देविसिंग पाडवी,विलास तडवी,उमेश तडवी,मगण वसावे आदीसह अन्य आदिवासी जमातीचे विद्यार्थी उपस्थित होते.
मणिपूर राज्यामध्ये भाजप सरकारने मैतेई जमातीला आदिवासी आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यामुळे कूकी व नागा या मूळ आदिवासी जमातींचा संतप्त प्रतिक्रियेनंतर मागील ३ महिन्यापासून दोन जमाती मध्ये हिंसाचार सुरू आहे.तेव्हा पासून अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत कित्येक घरे उद्ध्वस्त झाली आहेत हजारो कुटुंबांना गावेसोडून स्थलांतरित व्हावे लागले आहे.जनजीवन विस्कळित झाले आहे दोन दिवसांपूर्वी मे महिन्यात २आदिवासी जमातीच्या महिलांवर सामूहिक बलात्कार व नग्न धिंडचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत या घडलेल्या घटनेच्या नंतर मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री यांच्या प्रतिक्रिये नंतर केंद्रातील भाजप सरकार व राज्यातील भाजप सरकारच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे भाजप सरकार पुरस्कृत हिंसाचार आहे की काय?असा थेट सवाल विचारला जात आहे.सादर घटना अत्यंत क्रूर व अमानवीय आहे सदर कृत्य करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी व सदर घटना दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या मणिपूर राज्यशासनाने केल्याचे दिसून येत आहे म्हणून मणिपूर मुख्यमंत्री,गृहमंत्री यांचे राजीनामे घेऊन यांचेसह संबंधित प्रशासन यंत्रणा यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदन जयश्री आव्हाड उपजिल्हाधिकारी यांना संध्या पावरा, मिनाक्षी वसावे, वर्षा वळवी या मुलींच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी डॉ.जालिंदर घिगे, ॲड.अरुण जाधव,योगेश साठे,डॉ.पंकज खर्डे आदींनी मनोगत व्यक्त केले.
मणिपूर इथे दोन आदिवासी महिलांची अर्धनग्न धिंड काढल्याचे प्रतिसाद आता नगर जिल्ह्यात देखील उमटण्यास सुरुवात झालेली असून नगर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी बांधव असलेल्या विद्यार्थ्यांकडून भाजप सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. २४ तारखेला सकाळी साडेअकराच्या सुमारास आदिवासी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केलेली असून यावेळी मणिपूर येथील हिंसाचाराचा यावेळी तीव्र निषेध करण्यात आला सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या प्रकरणी ७९ दिवसापर्यंत मौन बाळगल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला आहे.आदिवासी बांधवांमधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटलेले होते.मणिपूर राज्यात भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे भडकलेल्या हिंसाचारात आदिवासी महिलांची अर्धनग्न अवस्थेत धिंड काढून त्यानंतर बलात्कार करून खून केल्याच्या घटनेसह दररोज घडणाऱ्या इतरही घटनांच्या निषेधार्थ आदिवासी विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमलेले होते त्यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांचा देखील यावेळी निषेध एकमुखाने करण्यात आलेला आहे.आदिवासी विद्यार्थ्यांनी यावेळी मणिपूरचे मुख्यमंत्री यांच्यावर बिरेनसिंह यांच्यावर निशाणा साधलेला असून केंद्र सरकारच्या आदिवासी बांधवांच्या विरोधातील धोरणामुळे अशा घटना होत असल्याबद्दल संताप व्यक्त केलेला आहे. अनेक आदिवासी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या निदर्शनात सहभागी झालेले होते त्यावेळी केंद्राने लवकरात लवकर योग्य ती पावले उचलावी अशी एकमुखी मागणी सर्व आदिवासी बांधवांकडून करण्यात आलेली आहे.