मुंबई/प्रतिनिधी – नोव्हेंबर महिन्यात दिवाळीचे औचित्य साधून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ‘लोकशाही दीपावली’ स्पर्धा आयोजित केली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली आहे.मतदारयाद्यांचे अद्ययावतीकरण आणि मतदार नोंदणीचा नवीन अर्हता दिनांक जाहीर करण्यासाठी भारत निवडणूक आयोग दिनांक 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत पुनरीक्षण कार्यक्रम राबविणार आहे. दिनांक 1 नोव्हेंबर 2021 रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या https://ceo.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत 1 जानेवारी 2022 रोजी 18 किंवा अधिक वय असलेले नागरिक आपले नाव मतदार यादीत नोंदवू शकणार आहे. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची अधिक माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महाराष्ट्रात दिवाळीच्या काळात घरोघरी आकाशदिवा लावला जातो आणि रांगोळी काढली जाते. याच आकाशदिवा आणि रांगोळीच्या माध्यमातून यंदाची दिवाळी लोकशाहीमय साजरी करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे. ‘सक्षम लोकशाहीची पहिली पायरी – मतदार नोंदणी’ हे लक्षात ठेवून आकाशदिवा तयार करताना आणि रांगोळी काढताना नागरिकांनी मतदारयादीत नाव नोंदविण्याचे आवाहन करावे. आकाशदिवा आणि रांगोळी यांमध्ये लोकशाही, निवडणूक, मतदान यासंबंधीच्या विविध प्रतिकांचा वापर करावा. जसे डाव्या हाताचे अंगठ्याच्या बाजूचे शाई लावलेले बोट, मतदान केंद्र, मतदान पत्रिका, ईव्हीएम मशीन इ. वापरावा. शिवाय, मतदार नोंदणी; नाव वगळणी; तसेच, मतदारांनी त्यांचे नाव, पत्ता, जन्मदिनांक, वय, लिंग, मतदार ओळखपत्र इत्यादी तपशील अचूक आहेत हे मतदार यादीत पाहावे; चुकीच्या तपशिलांत दुरुस्त्या कराव्यात, याकरिता मतदारांना आवाहन करण्यासाठी आकर्षक घोषवाक्यांचा वापर करावा.
बऱ्याच मतदारांना असे वाटते की, आपल्याकडे मतदार ओळखपत्र आहे म्हणजे आपण मतदान करू शकतो. पण तसे नसून मतदान करण्यासाठी मतदारयादीत नाव असणे आवश्यक आहे. तेव्हा सर्व मतदारांनी मतदारयादीत आपले नाव आणि इतर तपशील तपासून घ्यावेत, तपशिलात बदल असतील तर संबंधित अर्ज भरावा, 18 वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांनी नाव नोंदणी करावी, या दृष्टीने आकाशदिवा आणि रांगोळी यांच्या माध्यमातून आवाहन करण्यात यावे.
स्पर्धा सर्वांसाठी खुली असून, स्पर्धकांनी स्पर्धेचे साहित्य 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत https://forms.gle/hHf11MvySTVUmccZ6 या दुव्यावर पाठवावे. आकाशदिवा आणि रांगोळी या दोन्ही स्पर्धांसाठी प्रत्येकी अकरा हजार रुपये (प्रथम क्रमांक), सात हजार रुपये (द्वितीय क्रमांक), पाच हजार रुपये (तृतीय क्रमांक) आणि दोन्ही स्पर्धांसाठी प्रत्येकी एक हजार रुपयांची दहा उत्तेजनार्थ पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी 8669058325 (प्रणव सलगरकर) या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संदेश पाठवून संपर्क साधावा. स्पर्धेची आणि विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची अधिक माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर पाहता येईल. अधिकाधिक स्पर्धकांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन यंदाची दिवाळी लोकशाहीमय करण्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आवाहन केले आहे.
स्पर्धेची नियमावली :
- स्पर्धा सर्वांसाठी खुल्या आहेत.
- स्पर्धकाला आकाशदिवा आणि रांगोळी यांपैकी एका किंवा दोन्ही स्पर्धांमध्ये भाग घेता येईल. दोन्ही स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी दोन्हींचे साहित्य गुगल अर्जामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे स्वतंत्र विभागात पाठवावे.
- आकाशदिवा (आकाशकंदील) स्पर्धा :-
- आकाशदिवा तयार करण्यासाठी पर्यावरणपूरक साहित्य वापरलेले असावे.
- लोकशाही, मतदार नोंदणी, मताधिकार या विषयांना अनुसरून तयार केलेल्या आकाशदिव्याचे विविध कोनांतून काढलेले तीन फोटो पाठवावेत.
- प्रत्येक फोटो हा जास्तीत-जास्त ५ MB साइजचा व JPG फॉरमॅटमध्येच असावा. तीनही फोटोंची एकत्रित साइज १५ MB पेक्षा जास्त असू नये.
- फोटोवर कोणाचेही नाव, लोगो, चित्र, फ्रेम, डिजाइन, असे अधिकचे काही जोडू नये.
- आकाशदिवा स्पर्धेसाठी टांगलेल्या आकाशदिव्याची चित्रफीत पाठवावी, जेणेकरून आकाशदिव्याची सजावट चहुबाजूंनी दिसू शकेल. ही चित्रफीत कमीत-कमी ३० सेकंदांची आणि जास्तीत-जास्त एक मिनिटाची असावी.
- आकाशदिव्याच्या चित्रफितीची (व्हिडिओची) साइज जास्तीत-जास्त ३०० MB असावी. तसेच, ही ध्वनिचित्रफीत mp4 फॉरमॅटमध्ये असावी.
- आकाशदिव्याची चित्रफीत (व्हिडिओ) अपलोड करताना, चित्रफितीत कोणाचेही नाव, लोगो, चित्र, फ्रेम, डिजाइन, असे अधिकचे काही जोडू नये.चित्रिकरण करताना सजावटीचे वर्णन करतानाचा आवाज मुद्रित (रेकॉर्ड) केल्यास चालेल.
- आकाशदिवा स्पर्धेंसाठी निश्चित केलेल्या लोकशाही, मतदार नोंदणी, मताधिकार या विषयांशी संबंधित आकाशदिव्याचे तीन फोटो आणि चित्रफीत पाठवणाऱ्या स्पर्धकाचाच अर्ज ग्राह्य धरला जाईल.
- रांगोळी स्पर्धा :-
- लोकशाही, मतदार नोंदणी, मताधिकार या विषयांशी संबंधित रांगोळीचे विविध कोनांतून काढलेले तीन फोटो पाठवावेत.
- प्रत्येक फोटो हा जास्तीत-जास्त ५ MB साइजचा व JPG फॉरमॅटमध्येच असावा. तीनही फोटोंची एकत्रित साइज १५ MB पेक्षा जास्त असू नये.
- फोटोवर कोणाचेही नाव, लोगो, चित्र, फ्रेम, डिजाइन, असे अधिकचे काही जोडू नये.
- रांगोळी स्पर्धेसाठी निश्चित केलेल्या लोकशाही, मतदार नोंदणी, मताधिकार या विषयांशी संबंधित रांगोळीचे तीन फोटो पाठवणाऱ्या स्पर्धकाचाच अर्ज ग्राह्य धरला जाईल.
- आकाशदिवा आणि रांगोळी यांमध्ये घोषवाक्यांचा वापर केला असेल तर गुगल अर्जामध्ये ती घोषवाक्ये लेखी स्वरूपातही पाठवावीत.
- आपले फोटो आणि चित्रफीत https://forms.gle/hHf11MvySTVUmccZ6 या गुगल अर्जावरील माहिती भरून त्यावर पाठवावेत.
- स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी ८६६९०५८३२५ (प्रणव सलगरकर) या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संदेश (मेसेज) पाठवून संपर्क साधावा.
- दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ ते १५ नोव्हेंबर २०२१ या काळात आलेले साहित्यच स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाईल.
- आकाशदिवा आणि रांगोळी या दोन्ही स्पर्धांच्या बक्षिसांचे स्वरूप प्रत्येकी पुढीलप्रमाणे असेल:
अ. प्रथम क्रमांक :- ११,०००/-
ब. द्वितीय क्रमांक :- ७, ०००/-
क. तृतीय क्रमांक :- ५,०००/-
ड. उत्तेजनार्थ :- १,००० रुपयांची एकूण दहा बक्षिसे.
- 10. लोकशाही, मतदार नोंदणी, मताधिकार या विषयाशी संबंधित साहित्य पाठवणाऱ्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच, विजेत्यांना प्रमाणपत्र आणि मानचिन्ह देण्यात येईल.
- 11. आलेल्या साहित्यामधून सर्वोत्तम साहित्य निवडण्याचा अंतिम निर्णय परीक्षक आणि आयोजक यांच्याकडे राहील.
- 12. स्पर्धकाने पाठवलेल्या साहित्यावर अन्य कुणी स्वामित्व हक्क सांगितल्यास त्याची पडताळणी करण्याची जबाबदारी स्पर्धकाची असेल.
- 13. स्पर्धेतील उत्कृष्ट साहित्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या समाजमाध्यमांवर प्रसारित केले जाईल.
- 14. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या कार्यक्रमांमध्ये आकाशदिवा स्पर्धकांचे साहित्य प्रसारित केले जाईल. तेव्हा उत्कृष्ट आकाशदिवा स्पर्धकांनी आपले साहित्य जपून ठेवावे. कार्यालय आपल्याशी स्वतंत्रपणे संपर्क साधेल.
Related Posts
-
मतदान करण्यासाठी नागरिकांच्या मोठया रांगा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. जळगाव/प्रतिनिधी - देशभरात आज लोकसभा…
-
कल्याणच्या गावात वासूदेवांमार्फत मतदान जनजागृती
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/9C6Hl1EzVyI?si=Aakzdu0WxecI_CZ5 कल्याण/प्रतिनिधी - लोकसभा सार्वत्रिक…
-
कोल्हापुरात म्हशी पळवण्याची अनोखी स्पर्धा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कोल्हापुर/प्रतिनिधी - हलगीचा कडकडाट… घुंगराचा…
-
भारतीय स्पर्धा आयोगाच्या वतीने ब्रिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धा परिषदेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय स्पर्धा आयोग…
-
देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीचे मतदान शांततेत, ६३.९५ टक्के झाले मतदान
नांदेड/प्रतिनिधी - 90-देगलूर विधानसभा पोट निवडणुकीसाठी एकूण 412 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पूर्ण…
-
विचार करुन मतदान करा,हे शेवटचे मतदान असणार आहे-प्रियंका चतुर्वेदी
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. मुंबई/प्रतिनिधी - वाढत्या उन्हाच्या पाऱ्याबरोबर…
-
पर्यटन संचालनालयामार्फत महा व्हिडिओग्राफी स्पर्धा
प्रतिनिधी. मुंबई - पर्यटन संचालनालयामार्फत १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी…
-
अतिसंवेदनशील भागात मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. गडचिरोली/प्रतिनिधी - लोकसभा निवडणूक २०२४…
-
राज्य नाट्य स्पर्धा डिसेंबरपासून सुरू होणार,राज्य व देशाबाहेरील रंगकर्मींसाठी ऑनलाईन स्पर्धा
मुंबई/प्रतिनिधी - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी रद्द करावी लागलेली, हीरक…
-
मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - देशातील लोकशाहीच्या…
-
लोकशाही मूल्यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी लोकशाही भोंडला स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - निसर्गाच्या सर्जनशीलतेचा आणि निर्मितीशील स्त्रीशक्तीचा उत्सव म्हणजे नवरात्र,…
-
अमरावती मध्ये लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी…
-
कल्याण लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/ संघर्ष गांगुर्डे - राज्यातील…
-
प्रभात फेरीच्या माध्यमातून मतदान जनजागृती मोहिम
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.कल्याण/प्रतिनिधी - लोकसभा निवडणूक 2024 ची…
-
ग्रामपंचायतींसाठी १३ ऐवजी आता १६ ऑक्टोबरला मतदान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - विविध 18 जिल्ह्यांतील 82…
-
आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे बोधचिन्ह ठरविण्यासाठी स्पर्धा
मुंबई, दि. 29 : राज्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे…
-
डोंबिवलीत रंगल्या दिव्यांगाच्या जलतरण स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - पॅरा स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने…
-
‘गुलाबी मतदान केंद्रां’ची राज्य निवडणूक आयोगाकडून दखल
नेशन न्यूज मराठी टीम. शिर्डी/प्रतिनिधी – कोपरगावं तालुक्यात डिसेंबर २०२२…
-
कल्याणात तृतीयपंथीयांच्या किन्नर अस्मिता संस्थेत मतदान जनजागृती
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - लोकसभा सार्वत्रिक निवडणूक…
-
महाराष्ट्रात ९८ हजार ११४ मतदान केंद्रे, गत लोकसभेच्या तुलनेत २ हजार ६४१ मतदान केंद्रांची वाढ
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात…
-
जीवनदीप महाविद्यालयात रानभाज्यांच्या पंगतीतून पाककृती स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - विविध औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांची…
-
५ नोव्हेंबरला २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी मतदान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यभरातील सुमारे 2 हजार…
-
प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून…
-
मतदान बंद ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासन करेल का कारवाई?
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. यवतमाळ/प्रतिनिधी - जास्तीत जास्त मतदान…
-
प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची शासकीय…
-
भविष्यात लोकशाही टिकणार की नाही ? बाळासाहेब थोरात यांचा सवाल
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर/प्रतिनिधी - लोकशाहीचे संपादक कमलेश सुतार…
-
विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी अंदाजे सरासरी ६९.०८ टक्के मतदान
प्रतिनिधी. मुंबई - महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर, दोन शिक्षक आणि…
-
कल्याणात मतदान जनजागृती बाइक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी -संपूर्ण देशात लोकसभा निवडणूकीची…
-
बार्टीमार्फत विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
मुंबई/नेशन न्युज टीम - बार्टीमार्फत बँक, रेल्वे, एल.आय.सी. इ. व…
-
भारतीय लोक प्रशासन संस्थेच्यावतीने निबंध लेखन स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतीय लोक प्रशासन संस्था,…
-
घराणेशाहीतला सत्तासंघर्ष टिपणाऱ्या 'लोकशाही' चित्रपटाचे पोस्टर लाँच
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - घराणेशाहीतला हा सत्तासंघर्षाचा…
-
२४ जानेवारीपासून मुंबईत कामगार कबड्डी स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे…
-
नव वधू वरासह वऱ्हाडींनी घेतली मतदान करण्याची शपथ
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. लातूर/प्रतिनिधी - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा…
-
ग्रामपंचायतींमधील ७ हजार रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी २१ डिसेंबरला मतदान
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील 4 हजार 554 ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांमुळे रिक्त…
-
निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात रोहिणी खडसे यांनी केले मतदान
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. जळगाव/प्रतिनिधी - महाराष्ट्रभर लोकसभा निवडणुकीचे…
-
राज्यस्तरीय वामनदादा कर्डक महिला विशेष काव्यवाचन स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण- महाकवी वामनदादा कर्डक यांचे जन्मशताब्दी वर्ष…
-
निवडणुका रद्द झालेल्या ग्रामपंचायतीचे मतदान १२ मार्चला होणार
प्रतिनिधी. मुंबई - विविध कारणांमुळे निवडणूक रद्द केलेल्या नाशिक जिल्ह्यातील…
-
बीड मध्ये रंगणार राज्य बालनाट्य स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. बीड - महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य…
-
२१ डिसेंबरलाला होणार चार महानगरपालिकांतील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी मतदान
मुंबई/प्रतिनिधी - धुळे, अहमदनगर, नांदेड- वाघाळा आणि सांगली-मिरज-कुपवाड या चार महानगरपालिकांमधील…
-
जनमित्रांच्या अथक परिश्रमातून पालघरमध्ये मतदान प्रक्रिया झाली सुकर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पालघर/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत…
-
आत्मभान अभियानाअंतर्गत मुलांसाठी कोरोना जनजागृती संदर्भात व्हिडिओ स्पर्धा
चंद्रपूर - नागरिकांना विशेषत: लहान मुलांना कोरोना विषयक जनजागृती व्हावी…
-
बाल दिनानिमित्त जवाहर बालभवन तर्फे चित्रकला स्पर्धा संपन्न
मुंबई/प्रतिनिधी - आधुनिक भारताचे शिल्पकार भारतरत्न डॉ. पंडित जवाहरलाल नेहरू…
-
मतदान जनजागृतीसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची भव्य बाईक रॅली
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/Vw7QuEgYOxA?si=5qHZTxN-uBiuYjDw कल्याण/प्रतिनिधी -गेल्या निवडणूकीतील कल्याण…
-
बचतगटांवर कथा यशस्वीनींच्या राज्यस्तरीय यशकथा लिखाण स्पर्धा
मुंबई/प्रतिनिधी- महिला बचत गटांनी अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविले असून त्या…
-
मतदान यंत्रात अदलाबदली झाल्यामुळे मविआचे आमदार कैलास गोरंट्याल आक्रमक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. जालना/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीचा उत्सव…
-
लोकसभा निवडणुकीच्या ४४० मतदान केंद्रांची धुरा महिलांच्या हाती
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. मुंबई/प्रतिनिधी - महिला या पुरुषांच्या…
-
मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम, तयार केली मानवी साखळी
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. चंद्रपूर/प्रतिनिधी – तरुणाई ही देशाच्या…
-
लोकशाही हरवली, शाळेच्या बसवरील बॅनर ठरलाय चर्चेचा विषय
डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवलीत शाळेच्या बस लावलेल्या बॅनरची सर्वत्र चर्चा होत…
-
पहिली राष्ट्रीय मतदार स्पर्धा, जिंका रोख पारितोषिके
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सामूहिक सहभागातून लोकशाहीतील प्रत्येक…