महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image आरोग्य लोकप्रिय बातम्या

रुक्मिणीबाई रुग्णालयात अद्यावत सोयीसुविधा पुरविण्याची पालकमंत्री यांच्या कडे मागणी

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात अद्यावत सोयीसुविधा पुरविण्याची मागणी शिवसेना कल्याण महानगरप्रमुख तथा एम.एस.आर.डीसी सदस्य विजय साळवी यांनी ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली आहे.कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे रुक्मीणीबाई रुग्णालय असुन नसल्यासारखेच आहे. कोरोना महामारीच्या काळात सदर रुग्णालयाचा गोरगरीब नागरीकांना काहीही उपयोग झाला नाही, तेथे गेलेल्या रुग्णांना फक्त इतर रुग्णालयात पाठवण्याचे काम ते रुग्णालय करत होते. करोडो रुपये खर्चुन बांधलेले हे रुग्णालय, लाखो रुपये पगार देऊन ठेवलेले कर्मचारी या सर्व खर्चाचा गोरगरीब नागरीकांना उपयोग होत नाही.कल्याण शहरात असलेले हे महानगरपालिकेचे रुग्णालय शहरातील तसेच टिटवाळा, अंबिवली, मोहने व आजुबाजुची सर्व ग्रामीण विभाग येथील गोरगरीब नागरीकांना फार गरजेचे व आवश्याक आहे. परंतु तीथे कोणतीच वैद्यकीय उपचाराची सोय नसल्यामुळे गोरगरीब व गरजु नागरीकांना नाईलाजाने त्यांची आर्थिक परीस्थिती नसताना खाजगी रुग्णालयात जावे लागते. खाजगी रुग्णालयाचे मोठ्या रकमेचे बिल त्यांना कर्ज काढुन भरावे लागते, ते फार मोठ्या आर्थिक संकटात सापडतात.

या रुग्णालयात एक्सरे मशिन आहे पण चालू स्थितीमध्ये कधीतरी असते, रुग्णांना बाहेरुन एक्सरे काढुन आणायला सांगतात, तशीच परिस्थिती सोनोग्राफी, ब्लडटेस्ट व इतर वैद्यकिय चाचण्या बाबत आहे. रुग्णांना महागडी औषधे बाहेरुन आणण्यास सांगतात. मेडीकल स्टोअर्स व रुग्णालयातील कर्मचारी यांची आर्थिक सेटींग असते. महापालिकेच्या अनेक रुग्णवाहीका असतानाही तेथील कर्मचारी कमीशनच्या पैशांच्या लालचेपायी खाजगी रुग्णवाहीका रुग्णांना उपलब्ध करुन देतात, ताप सर्दीवर पण चांगले उपचार मिळत नाही. त्यामुळे ज्या गरीब रुग्णाची खाजगी रुग्णालयात जाण्याची परिस्थिती नसते तो घरात राहुन मरणाची वाट पहातो.या सर्व बाबींचा विचार करता रुक्मीणीबाई रुग्णालयास अद्यावत सर्व वैद्यकीय सेवा गरीबांना चांगल्याप्रकारे मिळू शकतील, तसेच कल्याण शहर हे तालूक्याचे शहर आहे त्यामुळे त्या शहरात एक तरी चांगले सरकारी रुग्णालय असायला पाहीजे, यासाठी लक्ष देऊन गोरगरीबांना भयानक त्रास देणारा वैद्यकीय सेवेचा हा प्रश्न सोडविण्याची मागणी निवेदन पत्र देऊन विजय साळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×